• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

by
March 19, 2026
in Blog, देश विदेश
0
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

जत /प्रतिनिधी.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व
मराठा समाज सांस्कृतिक भवनसाठी दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी, मराठा समाजाची जत नगरपरिषदेकडे शिष्टमंडळाद्वारे लेखी मागणी.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

प्रत्येक ठिकाणी मराठा समाज वगळता इतर समाजाची समाज मंदिर आहेत परंतु मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री व प्रशासकीय सेवेत असणारे अधिकारी यांना वाटत नाही का की, आपल्याही समाजाचे प्रत्येक तालुका स्थरावर सांस्कृतिक भवन असावे. जेणेकरून मराठा समाजाच्या विविध उपक्रमासाठी या सांस्कृतिक भवनाचा वापर करता येईल.

जत नगरपरिषद हद्दीत मराठा समाज सांस्कृतिक भवनसाठी व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी जत नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही वरचेवर मागणी करूनही आम्हाला जागा उपलब्ध करून दिली जात नाही. तरी जत नगरपरिषद हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी व मराठा समाज सांस्कृतिक भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

रयतेचे राजे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी ही जत नगरपरिषदेने दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी जत येथील हराळे समाज वसाहतीशेजारील शासकीय ओढापात्रात जत नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून उद्यानाची उभारणी केली होती. परंतु जागेच्या मालकीवरून वाद निर्माण झाल्याने या उद्यानाकडे तत्कालीन जत ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी असलेले व लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान खरेच अस्तित्वात होते की काय असे म्हणण्याची वेळ जत  शहर - रवासियांवर आली आहे.

यानंतर जत सांगली रस्त्याशेजारील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाजूस असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जागेवर जत नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची उभारणी केली आहे. परंतु सध्या जत नगरपरिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे या उद्यानाची दुरावस्था झाली असून लोखंडी अँगल व पत्रा लावून उद्यानाचे नाव लिहिलेल्या बोर्डावरील अक्षरे नाहीशी झाली आहेत. उद्यानातील झाडें नाहीशी झाली आहेत. उद्यानात लहान मुलांसाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली लोखंडी करमणूक साधने गंजून बाद झाली आहेत. अबालवृधाना बसण्यासाठी ठेवण्यात आलेले सिमेंट बाक मोडले आहेत.

अशी उद्यानाची दुर्दशा झाली असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्यानाच्या जागेवरच जत नगरपरिषदेची भव्यदिव्य अशी इमारत उभारणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या जत शहरातील उद्यानाचे अस्तित्वच नष्ट होणार असल्याने उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागण्याचे निवेदन मराठा समाजाचेवतीने जत नगरपरिषदेकडे दिले आहे.

यावेळी मराठा सेवासंघांचे जत तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, जत दूरदर्शन पतसंस्थेचे चेअरमन दीपक ( दादा ) शिंदे, डॉ. महेश भोसले, बाळासाहेब माने, मछिंद्र बाबर आदी उपस्थित होते.

Previous Post

बापानी केला मुला करीता त्याग २८ वर्षीय मुलास केली किडनी दान’सुपर’ स्पेशालिटीमध्ये ६९ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Next Post

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
37
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
Next Post

महापालिकेच्या 'अमृत सखीं'चा दिल्लीत गौरव; 'अमृत २.०' अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In