नायगाव तालुका प्रतिनिधी…दिपक गजभारे घुंगराळेकर…मांजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या नुतन शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडी संदर्भात नुकतीच बैठक घेण्यात आली.यावेळी बिनविरोध निवड पार पडली यात अध्यक्षपदी लक्ष्मीबाई उमेश मंगनाळे तर उपाध्यक्षपदी उमाताई मोतीराम पुंजाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मांंजरम येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे अडीच वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापन समितीची निवड लोकशाही पध्दतीने करण्यात येते.शालेय विद्यार्थींच्या इच्छूक पालकांना या निवडी मध्ये सहभागी होता येते.मुख्याध्यापक पी.आर.टीकाणे यांच्या अध्यक्षतेखाली पालकांच्या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीबाई उमेश मंगनाळे यांची तर उपाध्यक्षपदी उमाबाई मोतीराम पुंजाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर सदस्यपदी रिजवाना सादीक शेख, अनिता नागेश वाघमारे, बालाजी वैजनाथ पांचाळ, मारोती बापुराव बोईनवाड , गंगाधर गणपती फुगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे….
Discussion about this post