• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालघर जिल्ह्यातील महसूल प्रश्न सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा क्र १ सुरू

मार्च ते मे दरम्यान विविध पातळीवर एकदिवसीय शिबिराचे आयोजन ....जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड

by
March 5, 2026
in Blog
0
543
SHARES
615
VIEWS
Ad 1

पालघर, दि. ५ मार्च : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न जलदगतीने सोडविणे, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे आणि डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर वाढविणे या उद्देशाने राज्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” ७ मार्च पासून जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी (सा . प्र) रणजीत देसाई, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे उपस्थित होते.
मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद आणि नगर पंचायत पातळीवर एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, या शिबिरांमधून नागरिकांचे प्रलंबित महसूल विषय प्रश्न तात्काळ निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. शासनाच्या डिजिटल उपक्रमांद्वारे नागरिकांना Single Day Service Delivery अंतर्गत सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
मार्च ते मे दरम्यान शिबिरे
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मंडळ स्तरावर पूर्वतयारी १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पुढील तारखांना शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
७ मार्च व १४ मार्च – मंडळ स्तरावरील शिबिरे
१० एप्रिल व १७ एप्रिल – मंडळ स्तरावरील शिबिरे
८ मे व १५ मे – नगर परिषद व नगर पंचायत स्तरावरील शिबिरे
जमिनीच्या नोंदी, फेरफार व ७/१२ दुरुस्तीवर भर
या अभियानाअंतर्गत भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यांमधील त्रुटी दुरुस्ती, तसेच जिवंत ७/१२ मोहिमेअंतर्गत गावागावातील नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाणार आहे. शिबिराच्या दिवशी नागरिकांना अद्ययावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले .
डिजिटल ७/१२ ला कायदेशीर वैधता
महाभूमी पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या क्यूआर कोडयुक्त डिजिटल ७/१२ उताऱ्याला आता पूर्ण कायदेशीर वैधता प्राप्त झाली आहे, त्यामुळे तहसील कार्यालयातून स्वाक्षरीयुक्त कागदपत्र घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. शिबिरांमध्ये नागरिकांना डिजिटल ७/१२ डाउनलोड करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
प्रमाणपत्रे, ई-मोजणी व पीएम किसान सेवा
शिबिरांमध्ये लोकसेवा हक्क कायद्यानुसार उत्पन्न, रहिवासी, जातीचे तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे यांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. याशिवाय ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएम किसान योजना आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अकृषिक रूपांतरण प्रक्रियेत मोठे बदल
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील सुधारणा अधिनियम २०२५ नुसार अंतिम विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनींसाठी अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र परवानगी आवश्यक राहणार नाही. तसेच सनद प्रणालीही रद्द करण्यात आली असून एकवेळचे अधिमूल्य भरण्याची नवी सुलभ व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
शिबिरांमध्ये एक खिडकी प्रणाली Single Window Clearance पद्धती लागू करण्यात येणार असून तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारून तात्काळ निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी स्पष्ट केले.
व्यापक समन्वयासाठी समित्या
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची समिती कार्यरत राहणार असून अभियानाचे नियोजन व आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वय साधून हे अभियान लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महसूल विषयक प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुका निहाय कार्यक्रमाचे दिनांक व स्थळं पुढीलप्रमाणे :
पालघर तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ ग्रामपंचायत कार्यालय सभागृह भाजी मार्केट माहीम येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनोर येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २० मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय सभागृह सफाळे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी ला लालोंढे येथील स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय नागझरी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी बोईसर येथील डॉ. स. दा. वर्तक स्कूल सरावली येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी तारापूर येथील डॉ. होमी बाबा अणुऊर्जा सामुदायिक आणि बहुउद्देशीय भवन कुरगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी दहिसर तर्फे मनोर येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृह दहिसर येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ०८ मे २०२६ रोजी पालघर येथील भगिनी समाज सभागृह पालघर येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १५ मे २०२६ रोजी कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळा टेंभोडे येथे समाधान शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.

वसई तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी मांडवी येथील महावीर धाम जैन मंदिर शिरसाड फाटा शिरसाड येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ०९ मार्च २०२६ रोजी आगाशी येथील सेंट जोसेफ कॉलेज नंदाखाल कोफराड येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी विरार येथील अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार पूर्व येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी मानिकपूर येथील विश्वकर्मा हॉल नवघर वसई प. येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी निर्मळ येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय निर्मळ येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी कामं येथील जैन मंदिर कामण येथील जैन मंदिर पोमण येथे समाधान शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी वसई येथील एम.जी. परुळेकर हायस्कूल वसई येथे समाधान शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ०८ मे २०२६ रोजी पेल्हार येथील मदरमेरी हायस्कूल आचोळे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १५ मे २०२६ रोजी बोळींज येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालय उमराळे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

डहाणू तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय चिंचणी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी शामराव परळेकर महाविद्यालय आशागड येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी तलाठी कार्यालय वाणगाव येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कासा येथे समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय चारोटी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सायवन येथील ग्रामपंचायत कार्यालय धुंदलवाडी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी आंबेसरी येथील ग्रामपंचायत कार्यालय जामशेत येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ०८ मे २०२६ रोजी डहाणू येथील बहुउद्देशीय केंद्र चिखले येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १५ मे २०२६ रोजी मल्याण येथील तलाठी कार्यालय मल्याण येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वाडा तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कुडूस येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ०९ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मांडवा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कंचाड येथील ग्रामपंचायत कार्यालय हमरापुर येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोने येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय घोणसई मेट येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक ०८ मे २०२६ रोजी गणेश मैदान वाडा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १५ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय खानिवली येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विक्रमगड तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी तलाठी कार्यालय विक्रमगड येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी चिंचघर येथील ग्रामपंचायत कार्यालय देहर्जे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी तलाठी कार्यालय तलवाडा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जव्हार तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी रेड सॉईल रिसॉर्ट चव्हाण येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी साखरशेत येथील आश्रमशाळा देहरे येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जामसर येथील महादेव मंदिर देवतळी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मोखाडा तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी साई मंदिर मोखाडा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय खोडाळा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तलासरी तालुक्यात दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी ज्ञानमाता हायस्कूल झरी येथे समाधान शिबिराची आयोजन करण्यात आले आहे, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ठाकरबाप्पा हॉल तलासरी येथे समाधान शिबिराच्या आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

Source: जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील
Via: Kevil
Tags: Milind ChuriPranay MhatreRahul thakur
Previous Post

सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ येवला आगाराची नुतन कार्यकारनी जाहीर अध्यक्ष पदी मोरे तर सचिव पदी जगताप यांची निवड

Next Post

हिंदवी स्वराज्याचा जागर : आर्णीत शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
55
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
हिंदवी स्वराज्याचा जागर : आर्णीत शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान

हिंदवी स्वराज्याचा जागर : आर्णीत शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In