• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घोषणांचा गाजावाजा, पण तरतुदींची कमतरता : शेतकरी-विद्यार्थी-युवकांसाठी फसवा अर्थसंकल्प – उमेशभाऊ उईके माजी राज्य उपाध्यक्ष छात्रभारती

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

Ad 1

नितेश गट्टीवार गडचिरोली(चामोर्शी) दि.७ मार्च राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा फक्त उद्योजकांना खुश करणारा आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची टीका छात्रभारतीचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेशभाऊ उईके यांनी केली आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारच्या अनेक घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.उमेशभाऊ उईके म्हणाले की, निवडणुकीच्या जाहीर सभांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पामध्ये केवळ दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून त्यालाही विविध अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसून त्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असल्याची टीका त्यांनी केली.तसेच शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये ठोस आणि परिणामकारक तरतूद करण्यात आलेली दिसत नाही. वाढत्या महागाईच्या काळात शिक्षणाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या योजनांची अपेक्षा होती. मात्र सरकारने शिक्षण क्षेत्राकडे पुरेसे लक्ष दिले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे उईके यांनी सांगितले.अर्थसंकल्पामध्ये विविध समाजातील महापुरुषांच्या नावाने अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु त्या योजनांसाठी आवश्यक असलेल्या निधीची स्पष्ट तरतूद दिसत नाही. त्यामुळे या योजना केवळ घोषणांपुरत्याच मर्यादित राहण्याची शक्यता असून, जनतेच्या भावनांचा केवळ राजकीय वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली.आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याबाबतही उमेशभाऊ उईके यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी सुमारे 70 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच गडचिरोलीला “स्टील हब” म्हणून विकसित करण्याचेही सांगितले जात आहे. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या किंवा रोजगाराच्या संधी मिळणार याबाबत अर्थसंकल्पात साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.एकूणच पाहता हा अर्थसंकल्प युवा बेरोजगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेला आहे. मोठ्या घोषणा आणि आकर्षक शब्दांच्या आड प्रत्यक्षात ठोस उपाययोजना नसल्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी फसवा ठरत असल्याची प्रतिक्रिया छात्रभारतीचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेशभाऊ उईके यांनी व्यक्त केली.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

Next Post

कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
10
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
4
Next Post
कल्याणमध्ये ‘रन रागिणी २०२६’ चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन

कल्याणमध्ये 'रन रागिणी २०२६' चा थरार; महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य मॅरेथॉनचे आयोजन

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In