• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डीबीटी अनुदान तातडीने जमा करा; AISF चे आदिवासी विकास विभागावर ठिय्या आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

अमरावती | प्रतिनिधी | दि. ८ जुलै २०२६

आदिवासी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) योजनेचे अनुदान अद्याप जमा झाले नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रखडलेले अनुदान तातडीने वितरित करण्यात यावे, या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) च्या नेतृत्वाखाली अमरावती येथील अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

RelatedPosts

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

AISF च्या राज्य सचिव प्रतिक्षा ढोके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळत नसल्याचा आरोप केला. विशेषतः डीबीटीचे अनुदान रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, वसतिगृह, प्रवास तसेच दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी डीबीटीचे थकीत अनुदान तातडीने खात्यात जमा करावे, योजना कायमस्वरूपी सुरू ठेवावी, आर्थिक निकषांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची डीबीटी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या.

या मागण्यांसाठी AISF च्या वतीने सलग दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले. अखेर खासदार बळवंत वानखेडे यांच्या मध्यस्थीनंतर अप्पर आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांनी येत्या सात दिवसांत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

मात्र, सात दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा AISF ने दिला आहे.

या आंदोलनात AISF च्या राज्य सचिव प्रतिक्षा ढोके, राज्य कौन्सिल सदस्य अनंता कराळे यांच्यासह अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Previous Post

शंभूराजे देसाई यांच्या हस्तक्षेपानंतर कडवे खुर्द-केळेवाडी येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Next Post

रिसोड शहरात घाणीचे साम्राज्य; नगरपरिषदेच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये संताप

Related Posts

Blog

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
24
Blog

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026
7
Blog

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026
37
Blog

पोत्रा येथील मारामारी प्रकरणात अशोक हावळे व स्वाती हावळे यांना अटकपूर्व जामीन

August 23, 2026
26
Blog

दोंडाईचा आगाराला पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस; प्रवासी सेवेला मिळणार नवी गती

August 23, 2026
25
Blog

धुळे येथे पशुपालकांसाठी वराह पालन व पशुधन विकास कार्यशाळा संपन्न

August 23, 2026
23
Next Post

रिसोड शहरात घाणीचे साम्राज्य; नगरपरिषदेच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये संताप

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In