• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्द, चिकाटी आणि यशाचे मूर्तिमंत उदाहरण

by
March 7, 2026
in Blog
0
0
SHARES
124
VIEWS
Ad 1

भडगावच्या सिद्धांत शार्दुलने फत्ते केल्या अबॅकसच्या ८ लेव्हल्स! ‘सॉफ्टवेअर इंजिनिअर’ होण्याचे स्वप्न डोळ्यात

 भडगाव(प्रतिनिधी) शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द जर मनात असेल, तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे भडगाव येथील सिद्धांत शार्दुल याने सिद्ध करून दाखवले आहे. अबॅकस सारख्या कठीण विषयात त्याने केवळ प्राविण्यच मिळवले नाही, तर आठही लेव्हल्स यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 सिद्धांतने जेव्हा अबॅकसच्या पहिल्या लेव्हलला प्रवेश घेतला, तेव्हापासूनच त्याच्यातील गणिताची ओढ दिसून आली होती. पहिली लेव्हल पूर्ण केल्यावर मिळालेली ट्रॉफी पाहून त्याचे वडील अत्यंत आनंदित झाले होते. त्यांनीच शिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांतला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. काही काळापूर्वीच सिद्धांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अशा कठीण प्रसंगी अबॅकस क्लासचे शिक्षक रवींद्र पाटील हे सिद्धांतच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. "सिद्धांतची जबाबदारी आमची आहे," असे म्हणत त्यांनी त्याची फी माफ केली आणि त्याला सातत्याने मार्गदर्शन दिले.

पुणे येथील स्पर्धेत यश आणि भावूक क्षण
धुळे येथील ‘मॅप ऑफ मॅजिशियन’ या पहिल्या किताबापासून सुरू झालेला सिद्धांतचा हा प्रवास आज नॅशनल ट्रॉफीपर्यंत येऊन पोहोचला आहे. पुणे येथे जेव्हा त्याने आठवी लेव्हल पूर्ण केली, तेव्हा त्याची माता अनिता शार्दुल यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. “बाळा, तू तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहेस,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जंगी स्वागत आणि सत्कार
पुण्याहून यश संपादन करून भडगाव येथे परतल्यावर सिद्धांतचे जंगी स्वागत करण्यात आले. विश्वकर्मा फाउंडेशन व सकल सुतार समाज, भडगाव यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विठोबा मिस्तरी, किरण देवरे, बापूराव शार्दुल, दीपक वाघ, शरद हिरे, शरद निकम, दीपक गवळी, ईश्वर देवरे, एकनाथ खैरनार, गणेश खैरनार यांसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
सिद्धांतच्या या यशामध्ये त्याची आई अनिता, आजी मंदाबाई, आत्याआजी शांताबाई, आजोबा सुभाष नाना तसेच कपूर अहिरे, भालचंद्र अहिरे, मनीषा हिरे आणि समस्त शार्दुल, अहिरे व सूर्यवंशी परिवाराचे मोलाचे पाठबळ लाभले. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण कॉलनी परिसरातून आणि गावातून त्याचे अभिनंदन होत आहे.
—————- प्रतिक्रिया————
“वडिलांचे स्वप्न डोळ्यात घेऊन, भविष्यात मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहे आणि मी ते ध्येय नक्कीच गाठेन.” माझ्या परीवार व समाजाची मान उचांवण्यासाठी यशाचा प्रवास हा असाच सुरु राहिल.
— सिद्धांत शार्दुल

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

Previous Post

Next Post

भिरवंडे पूनाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
2

15
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
10
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post

भिरवंडे पूनाळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी १० लाखांचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In