• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखोंची बक्षीस रक्कम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

by
March 7, 2026
in Blog
0
शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखोंची बक्षीस रक्कम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

पुरंदर प्रतिनिधी दत्तात्रय लिंभोरे दि. २ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी (ता. पुरंदर) येथे शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शाळेचा परिसर आनंदमय झाला होता. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरंदर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आत्मारामभाऊ कामथे व कार्याध्यक्ष पंढरीनाथ कामथे (पोलीस निरीक्षक) यांच्या वतीने गतवर्षीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कै. इंदुबाई काशिनाथ लिंभोरे यांच्या स्मरणार्थ विकास काशिनाथ लिंभोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून दोन नवीन वर्गखोल्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच रूम टू रीड या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालयही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.ग्रामस्थांच्या सहकार्याने वार्षिक स्नेहसंमेलनासाठी १ लाख ५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम जमा करण्यात आली. याचवेळी कै. गंगाराम गेणू लिंभोरे यांच्या स्मरणार्थ वासुदेव (देवा शेठ) लिंभोरे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट देण्यासाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शेतकरी गीत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, देशभक्तीपर गीते, लावणी तसेच समाजप्रबोधनपर गीतांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी वाळुंज केंद्राच्या केंद्रप्रमुख सुरेखा कामथे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका तुषार कामथे, उपाध्यक्ष संतोष उत्तम लिंभोरे , सदस्य लहू लक्ष्मण कामथे,अंकुश लक्ष्‍मण कामथे, संतोष बबन जगताप, सचिन लहू कामथे, अजय विजय लिंभोरे, ऋतुजा किरण कामथे, स्वरांजली तेजस कामथे, सुवर्णा संदीप लिंभोरे, प्रियंका सोमनाथ लिंभोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर , कार्याध्यक्ष सुनील जगताप, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक मनोज सटाले, गणेश कामठे, पुरंदर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष कुंडलिक कुंभार, अश्विनी फुंदे, वर्षा जगताप, आरती सोनवणे, रयत शिक्षण संस्था सल्लागार शंकरराव मुगुटराव कामथे, ज्ञानेश्वर लिंभोरे, नवनाथ कामथे,विकास मोहन कामथे , नारायण कामथे, वासुदेव लिंभोरे, नवनाथ गायकवाड ,समीर कामथे, शिवाजी शिवरकर बाबुराव टेकवडे, विशाल कामथे, राहुल लिंभोरे,इम्रान मनेर,राजाभाऊ क्षीरसागर,,दिपक कामथे, फौजी संजय लिंभोरे, सुजीत लिंभोरे , एकनाथ फाळके, शरद कामथे,सदस्य, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षिका, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन श्वेता जगताप, मेघराज कुंभार, प्रकाश जगताप, रूपाली हरिहर, निर्मला पोमण, शोभा कचरे, वर्षा कामथे व उर्मिला पोरे या शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जगताप, निर्मला पोमण व रूपाली हरिहर विकास लिंभोरे तुकाराम कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सौ. श्वेता ज्ञानेश्वर जगताप यांनी मानले.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

Previous Post

जि. प . शाळा कोडशी खुर्द येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन..

Next Post

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा – सुधीर भद्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
2
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
2
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
15
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
10
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
9
Next Post

नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा – सुधीर भद्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In