• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कहाटुळमधील महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा; सतत पैसे मागायची म्हणून संपवले, ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

by
March 8, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
कहाटुळमधील महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा; सतत पैसे मागायची म्हणून संपवले, ६५ वर्षीय आरोपीला बेड्या

Oplus_131072

0
SHARES
56
VIEWS
Ad 1

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटुळ गावातील ६५ वर्षीय राणुबाई दुलब इशी यांच्या मृत्यूचे गूढ अखेर पोलिसांनी उलगडले आहे. राणुबाई यांचा खून गावातीलच ६५ वर्षीय व्यक्तीने केल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सतत पैसे मागत असल्यामुळे वैतागून डोक्यात वार करून व नंतर गळा आवळून राणुबाई यांची हत्या केल्याची कबुली आरोपी भिला लोटन माळी याने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कहाटुळ येथील राणुबाई दुलब इशी या ८ फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ३ मार्च २०२६ रोजी धुलिवंदनाच्या दिवशी गावालगत असलेल्या छोटू पाटील यांच्या शेतात त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.

RelatedPosts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

मृतदेहाची ओळख राणुबाई यांचे भाऊ कृष्णा पवार यांनी त्यांच्या अंगावरील साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रावरून पटवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवालातून राणुबाई यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा झाला गुन्हा उघड

घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.

या प्रकरणात सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा मिळत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी सीडीआर विश्लेषण, विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपासाची दिशा निश्चित केली.

तपासादरम्यान कहाटुळ येथील भिला लोटन माळी (वय ६५) याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. राणुबाई या सतत पैसे मागत असल्यामुळे संतापातून त्याने आधी त्यांच्या डोक्यात वार केला व नंतर गळा आवळून त्यांची हत्या केल्याचे त्याने सांगितले.

यांनी केला यशस्वी तपास

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संदीप वाघ, एलसीबीचे उपनिरीक्षक विकास गुंजाळ, शहादाचे उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलिस हवालदार देविदास विसपुते, योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरी, पोलिस शिपाई विकास शिरसाठ, भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी, कपिल मंदिल, एलसीबीचे पोलिस हवालदार जितेंद्र पाडवी, मोहन ढमढेरे, दादाभाई वाघ, मुकेश तावडे, सचिन वसावे, विशाल नागरे, पोलिस नाईक विकास कापुरे, पोलिस शिपाई शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्या पथकाने केला. त्यांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे अखेर या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Tags: Laxmikant Ishi
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेवर व्याख्यान संपन्न

Next Post

Related Posts

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
4
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
38
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
96
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
Next Post

ताज्या बातम्या

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In