• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उद्या भेंडाळा परीसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलन

by
March 11, 2026
in Blog
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा

आंदोलनात सहभागी होणार भेंडाळा परीसरातील शेतकरी व शेतमजूर

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

नितेश गट्टीवार गडचिरोली (चामोर्शी):दि.११ मार्च -तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाला स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून या विरोधाला आता आंदोलनाचे स्वरूप येत आहे.भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनी एमआयडीसी व औद्योगिक प्रकल्पासाठी अधिग्रहित करू नयेत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने उद्या दि.१२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेसच्या वतीने आगामी काळात ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येईल. तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखा पठाण, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, प्रभाकर वासेकर, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, श्रीनिवास ताडपलीवार, संजय गावडे, संजय चन्ने, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, मंजू आत्राम, मीनल चिमूरकर, शीतल ठवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आरोप केला की, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा हे सरकारमधील काही लोकांच्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी हिटलर सारखे मनमानी पद्धतीने आदेश काढत असल्यामुळे भूसंपादन होणाऱ्या परिसरात नागरिकांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. सरकार तसेच खाण माफियांच्या हितासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

उद्या दि.१२ मार्च रोजी होणाऱ्या या आंदोलनात हरणघाट मंदिराचे धर्माचार्य संत मुरलीधर महाराज देखील सहभागी होणार असून सरकारच्या निषेधार्थ ते स्वतःचे मुंडन करून आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.भेंडाळा परिसरातील सुपीक जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून आता जिल्ह्यात मोठे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत असून प्रशासन या आंदोलनाबाबत कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

Next Post

‘सनगर समाज ‘ बांधवांचा भव्य मेळावा…

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
54
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
78
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

'सनगर समाज ' बांधवांचा भव्य मेळावा...

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In