• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चैत्र पौर्णिमेला केळशीत आई श्री महालक्ष्मीचा भव्य रथोत्सव;अरबी समुद्र किनाऱ्यावर रंगणार श्रद्धेचा महासोहळा

by
March 19, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
चैत्र पौर्णिमेला केळशीत आई श्री महालक्ष्मीचा भव्य रथोत्सव;अरबी समुद्र किनाऱ्यावर रंगणार श्रद्धेचा महासोहळा
0
SHARES
91
VIEWS
Ad 1

दापोली/केळशी :रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भारजा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक वारसा लाभलेले केळशी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला चैत्र महिन्यात मोठ्या भक्तिभावात सुरुवात होत असून, चैत्र पौर्णिमेला होणारा भव्य रथोत्सव हा या यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.

चैत्र शुद्ध अष्टमीपासून सुरू होणारा हा उत्सव पौर्णिमेपर्यंत चालतो. या कालावधीत गावात धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.विशेष म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीचा रथ गावातून मोठ्या उत्साहात मिरवला जातो. रथ गावातील प्रत्येक वाड्या-वस्तीतून फिरत असताना घरोघरी देवीचे पूजन केले जाते आणि हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

केळशी येथील महालक्ष्मी मंदिराला पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा लाभला असून सुमारे अठराव्या शतकात उभारले गेलेले हे मंदिर कोकणातील प्राचीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार या यात्रेदरम्यान आठ दिवस देवीचा जागर केला जातो. देवीची मूळ मूर्ती सोन्याची असल्याचा समज भाविकांमध्ये प्रचलित आहे.

अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत वसलेले केळशी गाव, परिसरातील वाळूचे डोंगर आणि शांत निसर्गरम्य वातावरणामुळे यात्रेच्या काळात भाविकांसह पर्यटकांची ही मोठी गर्दी होते. श्रद्धा, परंपरा आणि कोकणी संस्कृतीचा संगम असलेली ही यात्रा कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचे जिवंत दर्शन घडवते.

या सोबतच मुंबई,पुणे यांसारख्या मोठ्या शहरां मधूनही हजारो भक्त विशेषतः या रथोत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी केळशीमध्ये हजेरी लावतात. काही जण कुटुंबासह मुक्काम करून पारंपरिक सोहळ्यांचा अनुभव घेतात, तर अनेक भक्त नवस पूर्ण करण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे केळशीची ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा न राहता राज्यभरातील भाविकांना एकत्र आणणारा श्रद्धेचा उत्सव ठरतो.

चैत्र पौर्णिमेला केळशीत आई श्री महालक्ष्मीचा भव्य रथोत्सव;अरबी समुद्र किनाऱ्यावर रंगणार श्रद्धेचा महासोहळा

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

सावंगा विठोबा हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री कृष्णाजी उर्फ अवधूत महाराजांची समाधी आहे, जी सुमारे 300 वर्षांपूर्वीची आहे.

Next Post

Kazino etiketi Başlayacaq olanlar üçün vacib qaydalar

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
31
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
3
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
34
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
4
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
3
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
0
Next Post

Kazino etiketi Başlayacaq olanlar üçün vacib qaydalar

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In