• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद च्या 4 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड….🔵

by
March 19, 2026
in Blog
0
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद च्या विद्यार्थ्यांची उतूंग भरारी..

*अखेर परंपरा कायम*यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील झरी तालुक्यातील छोटेसे गाव वेडद येथील नुकत्याच पार पडलेल्या नवोदय परीकक्षेत चार चीमुकल्यांनी उत्तम व भरघोस गुणांनी यश प्राप्त केले.कारणही तसेच आहे गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा कायम असल्याचे बोलले जात आहे.मागील वर्षी सुद्धा दोन व या वर्षी चार विद्यार्थी नवोदय परीक्षेत यश संपादन केले.म्हणजे वर्षानुवर्ष जोपासलेली परंपरा काम करत असताना दिसून येत आहे.

17 मार्च 2026 रोजी नवोदय चा निकाल जाहीर झाला . वेडदच्या शिक्षक – विद्यार्थी – पालक या त्रिकुटाच्या परिश्रमाला भरभरून यश मिळाले . छोट्याशा वेडद गावाच्या शाळेतून 4 विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरले . यामध्ये विद्यार्थी – पालक – शिक्षक या समन्वयानेच हे यश मिळाले . खेड्यापाड्यात सुद्धा ही गुणवत्ता आहे, गरज आहे ती फक्त योग्य समन्वयाची . तो समन्वय वेडद या गावात साधला गेला .त्यामुळे सुरुवातीला 2 विदयार्थी मागील वर्षी 2 विद्यार्थी तर या वर्षा 4 विद्यार्थी पात्र ठरले . या गुणवत्तापूर्ण यशाच कौतुक करण्यासाठी समस्त वेडद ग्रामवासी , शिक्षकवृंद , मित्रमंडळी , आप्तेष्ट नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला . त्याचप्रमाणे शिक्षणविभाग झरी चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सन्मा. श्री खैरनार साहेब , केंद्रप्रमुख श्री उदार सर , केंद्रप्रमुख श्री आरमुरवार सर , आमचे शेजारी श्री अक्केवार सर , श्री राजुलवार सर तसेच श्री कडू सर यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन पात्र विद्यार्थी – पालक – शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला . मान्यवरांनी अनमोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी भाषणातून दिशा दिली . याप्रसंगी मा . खैरनार साहेबांनी पात्र विद्यार्थ्यांना बक्षिस स्वरूपात कंपासपेटी देऊ केले . मा. श्री काटकर साहेबांनी संदेशामार्फत सर्व मुलांचे अभिनंदन केले .तसेच श्री अक्केवार सर यांनी या मुलांना इंग्रजी डिक्शनरी बक्षिस देण्याचे जाहीर केले . सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .
एक जबाबदार मुख्याध्यापक म्हणून श्री नानाजी लोहकरे सर , वर्ग शिक्षक म्हणून श्री ठकसेन पेंदोर सर , श्री तेजस सर , श्री मेश्राम सर , श्री धारणे सर यांचे मार्गदर्शन , अध्यक्ष तथा समस्त शा . व्य. समिती ने कुठेही कसर सोडली नाही . विद्यार्थी व पालकांनी सुद्धा आमच्या प्रयत्नाला मोठ्या कष्टाने साद व साथ दिली . परिणामी अतिशय चांगल्या गुणांनी विद्यार्थ्यानी आपला प्रवेश नवोदय विद्यालयात मेहनतीने निश्चित केला . अशा अथक परिश्रमाने आजचा आनंददायी दिवस सर्वांना अनुभवास मिळाला. खऱ्या अर्थाने दिवसरात्र एकत्र करून पेंदोर सर यांनी वेळेचे भान नं ठेवता त्या छोट्याशा विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवून यश प्राप्त करून दिले. म्हणून विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना त्या गुरु मध्ये त्यांच्या मुलांचं भविष्य दिसत होत.त्या गुरु बद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द अपुरे पडतील असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. झरी तालुक्यातील दुर्गापूर , खातेरा व आर्या स्कूल मधील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन !!आणि शेवटी सर्व ग्रामस्थांनी शिक्षकांचे मनापासून आभार मानले.

वेडदचे नवोदय वीर –
1)पुरब देविदास गावंडे – 95 %
2) सानिया दादाजी धोबे-
93.50 %
3) प्रतिक राजेश घुंगरुड – 91.25 %
4) सात्वीक हरीचंद्र चौधरी – 91.25 %

यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या या आनंदासाठी कारणीभुत ठरलेल्या व सहकार्य केलेल्या सर्वांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडदच्या वतीने खूप खूप आभार !

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

धुमधडाक्यात ग्रामस्थांनी चिमुकल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे केले स्वागत

विद्यार्थी उत्साह
Previous Post

दै. लोकाशाची होळी करत संपादकांविरोधात पोलीसात तक्रार दाखल करुन कडक कारवाई करण्याची चकलांबा ग्रामस्थांची मागणी

Next Post

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात ३६ वा वर्धापन दिन व वार्षिक यात्रा महोत्सवाचा मंगल सोहळा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

संवत्सर येथील महानुभाव आश्रमात ३६ वा वर्धापन दिन व वार्षिक यात्रा महोत्सवाचा मंगल सोहळा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In