• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याचा धुमाकूळ; एकूण पाच शेळ्या ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याचा धुमाकूळ; एकूण पाच शेळ्या ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

नेवासा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत एकूण पाच शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास अक्षय बाळासाहेब शिंदे यांच्या गोठ्यात बिबट्याने तारेच्या कुंपणावरून उडी मारून प्रवेश केला. त्यानंतर गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करत चार शेळ्यांचा फडशा पाडला. सकाळी गोठ्यात हालचाल दिसत नसल्याने पाहणी केली असता मृत शेळ्या आणि रक्ताने माखलेला परिसर पाहून शेतकऱ्यांना धक्का बसला.

या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी नानासाहेब अण्णासाहेब शिंदे यांची एक शेळी बिबट्याने ठार केली होती. त्यामुळे एकूण पाच शेळ्यांचा बळी गेला आहे.

परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी पंचक्रोशीतील शेतकरी करत आहेत.

दरम्यान, सुरेगाव (गंगा), बोरगाव, उस्थळ आणि बेलपांढरी या शिवारात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Tags: Pralhad Shinde
Previous Post

हरि अण्णा जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; मुंजवाड–तरसाळी फाटा रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

Next Post

शिरसगाव–वरखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला इशारा; १ एप्रिलपर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
8
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
शिरसगाव–वरखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला इशारा; १ एप्रिलपर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

शिरसगाव–वरखेड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला इशारा; १ एप्रिलपर्यंत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In