• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन….
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

कळंबोली (ता.प्रतिनिधी)- मराठी चित्रपट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित २८ वा ‘सांस्कृतिक कलादर्पण मराठी चित्रपट महोत्सव’ २ आणि ३ एप्रिल २०२६ रोजी कळंबोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात प्रेक्षकांना केवळ ५० रुपयांत दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. कळंबोली येथील सुधागड शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात, नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत हा महोत्सव पार पडणार आहे.

‘कलादर्पण’चे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी या महोत्सवाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, या महोत्सवाच्या आयोजनात ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’चे अध्यक्ष कांतीलाल कडू यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

मराठी चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि उदयोन्मुख कलाकारांना एक योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या २८ वर्षांपासून हा महोत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीला अधिक बळकट आणि समृद्ध करण्यात हा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते होणार आहे.

या दोन दिवसीय महोत्सवादरम्यान ‘आदिशेष’, ‘फुला’, ‘गुलकंद’, ‘भेरा’, ‘अमायरा’, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’, ‘रीलस्टार’, ‘जय भीम पँथर’, ‘एप्रिल मे १९’ आणि ‘छबी’ यांसारखे दहा दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातील.

‘सांस्कृतिक कलादर्पण २०२६’ मराठी लघुपट महोत्सवातील अंतिम फेरीतील लघुपटांचा पारितोषिक वितरण समारंभही २ एप्रिल रोजी याच महोत्सवाच्या अंतर्गत पार पडणार आहे.

सर्वोत्कृष्ट लघुपट: सकाव, वाट, सातबारा, साथ; लक्षवेधी लघुपट: पत्रावळ, स्वाभिमान ध्यास शिक्षणाचा, अत्तर; सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अक्षय वास्कर (सकाव, सातबारा), गिरीश कोरवे (वाट), अविनाश राऊत (साथ). सर्वोत्कृष्ट कथा: नीरजा कृष्णा (सकाव),

गिरीश कोरवे (वट), अक्षय वास्कर (सातबारा), अविनाश राऊत (साथ), रामकुमार शेडगे (अत्तर); सर्वोत्कृष्ट अभिनेता: सौरभ चौगुले, पिंटू पाटील, सुनील पाटेकर, राहुल बर्डे; सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: प्रतिमा कृष्णा, शीतल रेडकर, सुवर्णा लाड, अक्षता आचरेकर. सहाय्यक कलाकार आणि तांत्रिक श्रेणींमध्येही विविध नामांकने जाहीर करण्यात आली आहेत.

लघुपट पुरस्कार वितरण समारंभ २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पार पडेल. या महोत्सवाची सांगता ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ‘छबी’ या चित्रपटाने होईल.

दरम्यान, आयोजक चंद्रशेखर सांडवे यांनी अधिकाधिक प्रेक्षकांनी माफक दरात दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Previous Post

भैरवनाथ खोरी देवस्थानचा होणार कायापालट; ५१ हजारांच्या पहिल्या वर्गणीतून जीर्णोद्धाराला सुरुवात

Next Post

रमजान ईद निमित्त दर्यापूरमध्ये आमदार गजाननभाऊ लवटे यांचा मुस्लिम बांधवांशी संवाद; शुभेच्छांचा वर्षाव

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
20
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
28
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
10
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
44
Next Post
रमजान ईद निमित्त दर्यापूरमध्ये आमदार गजाननभाऊ लवटे यांचा मुस्लिम बांधवांशी संवाद; शुभेच्छांचा वर्षाव

रमजान ईद निमित्त दर्यापूरमध्ये आमदार गजाननभाऊ लवटे यांचा मुस्लिम बांधवांशी संवाद; शुभेच्छांचा वर्षाव

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In