• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भैरवनाथ खोरी देवस्थानचा होणार कायापालट; ५१ हजारांच्या पहिल्या वर्गणीतून जीर्णोद्धाराला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
191
VIEWS
Ad 1

मळद (ता. दौंड) / प्रतिनिधी :
गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ खोरी देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी यंदाच्या यात्रा उत्सवातून भव्य सुरुवात करण्यात आली आहे. दर्शन घेऊन ५१ हजार रुपयांची पहिली वर्गणी जाहीर करत यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री. किशोर नवले यांनी या लोककार्याची मुहूर्तमेढ रोवली.

देवस्थान परिसराचे सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी जागेची कमतरता भासत होती. यावर उपाय म्हणून अध्यक्ष किशोर नवले यांनी कपिला कृषी फार्मचे सर्वेसर्वा श्री. राहुलजी ढोले पाटील यांच्याशी चर्चा केली. देवस्थानाच्या विकासासाठी १० गुंठे जागा देण्याची विनंती त्यांनी केली असता, राहुलजी ढोले पाटील यांनी ती तत्काळ मान्य केली. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या शुभप्रसंगी गावातील मान्यवर आणि यात्रा कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष श्री. किशोर नवले, विद्यमान उपसरपंच डॉ. दत्तात्रय शेलार, यात्रा कमिटी सदस्य श्री. दत्तात्रय शेलार, श्री. नितीन दुधे, श्री. अतुल जाधव, श्री. नवनाथ दुधे, श्री. अजय म्हेत्रे, श्री. बापू नवले, श्री. चंद्रकांत जाधव आदींचा समावेश होता.

देवस्थान परिसराची साफसफाई करून सुशोभीकरण करण्यात येणार असून भाविकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. राहुलजी ढोले पाटील यांनी दिलेल्या १० गुंठे जागेमुळे मंदिर परिसराचा विस्तार होऊन भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

येत्या काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, या उपक्रमामुळे भैरवनाथ खोरी देवस्थानाचा चेहरामोहरा पूर्णतः बदलणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

जंगलापुर नजिक टँक्टर पलटी; पाच जण गंभीर जखमी

Next Post

कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन….

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
5
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
45
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कळंबोली येथे “मराठी चित्रपट महोत्सवाचे” आयोजन….

कळंबोली येथे "मराठी चित्रपट महोत्सवाचे" आयोजन….

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In