दर्यापूर (जि. अमरावती) / प्रतिनिधी :
पवित्र रमजान ईद निमित्त दर्यापूर येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार गजाननभाऊ लवटे यांनी अंजनगाव रोड, बाभळी येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार लवटे यांनी सांगितले की, रमजान ईद हा सण बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश देणारा असून समाजातील सर्व घटकांनी एकोप्याने राहून सण साजरे करणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमास विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अंकुश पाटील कावडकर (युवासेना जिल्हाप्रमुख), बबनराव विल्हेकर (शिवसेना विधानसभा संघटक), सुधाकर पाटील भारसाकळे (तालुका अध्यक्ष काँग्रेस), सुनील पाटील गावंडे (सभापती बाजार समिती दर्यापूर), गुणवंतभाऊ गावंडे (तालुका संघटक), मोहनभाऊ बायसकर (नरसिंगपूर येथील सरपंच), दीपकभाऊ बगाडे (उपशहरप्रमुख दर्यापूर), नितेश भाऊ वानखडे (युवक काँग्रेस सचिव), तसेच ईश्वर भाऊ बुंदिले यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या प्रसंगी परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.









