• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबार-धुळे जिल्ह्यातील तरुणांसाठी सुवर्णसंधी; २७ मार्चला शहादा येथे भव्य रोजगार मेळावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

शहादा, दि.२२ (प्रतिनिधी) :
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून शहादा येथे भव्य जिल्हास्तरीय संयुक्त भोईसमाज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २७ मार्च रोजी मोहिदा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे नामांकित कंपन्यांचा सहभाग. Haier, LG, Hyundai, JCB, Fiat, Tata Group आणि Coca-Cola यांसारख्या ३० हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

हा रोजगार मेळावा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (नंदुरबार), भोईसमाज कल्याणकारी मंच, जनसेवा फाउंडेशन आणि स्व. विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मंगेश वाघ यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महेबुब भाई सैयद, बालाजी आळंदीकर, सुपडू खेडकर यांच्यासह विशाल उवाळे, स्वास्तिक जाधव आणि राकेश पाटील उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर व पदविकाधारक उमेदवारांना करिअर मार्गदर्शन आणि नोकरीच्या संधी मिळणार आहेत. इच्छुकांनी आपला बायोडाटा (CV) आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. महेंद्र खेडकर यांनी केले आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

रमजान ईद निमित्त दर्यापूरमध्ये आमदार गजाननभाऊ लवटे यांचा मुस्लिम बांधवांशी संवाद; शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

ग्राहक समिती महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी जाहीर; जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In