• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण सहलीचा अनोखा अनुभव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्पार्क फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण सहलीचा अनोखा अनुभव
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पालघर प्रतिनिधी:
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी आणि कायमस्वरूपी लक्षात राहणारे असते. याच उद्देशाने स्पार्क फाउंडेशन, ठाणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद ISO शाळा, कोचाळे येथील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.

या सहलीत इयत्ता पाचवी ते आठवीच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांसह ४ शिक्षक, ८ पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी झाले होते. या अभ्यासपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक, धार्मिक आणि वैज्ञानिक स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नाशिक येथील प्रसिद्ध जैन मंदिराला भेट देऊन भगवान महावीर यांच्या सुंदर कोरीव मूर्तीचे दर्शन घेतले तसेच गोशाळेची पाहणी केली. त्यानंतर पांडव लेणी येथे प्राचीन शिलालेख, गुहा आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या दगडात कोरलेल्या मूर्तींचा अभ्यास केला.

यानंतर विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण येथे विज्ञाननिष्ठ शो पाहिला. या शोमधून सूर्यमाला, ग्रह-तारे, त्यांची निर्मिती आणि उपग्रह याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली.

पुढे पेरूची वाडी येथे विविध प्राणी-पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात आले. ससे, रंगबिरंगी पक्षी, शहामृग, मोठे सरडे, काश्मिरी बकरी यांसारख्या विविध प्रजातींचा विद्यार्थ्यांनी जवळून अनुभव घेतला. तसेच अस्सल पेरूपासून बनवलेल्या आईस्क्रीमचा आस्वाद घेत मुलांनी सहलीचा आनंद लुटला.

शेवटी नाशिक येथील प्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट देऊन धार्मिक अनुभवही घेतला.

अशा प्रकारे ऐतिहासिक, धार्मिक आणि वैज्ञानिक अनुभवांची त्रिवेणी असलेली ही सहल स्पार्क फाउंडेशनच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

Tags: Saurabh Kamdi
Previous Post

बोदर्डे येथे श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Next Post

गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाईविरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेसचे आंदोलन

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाईविरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेसचे आंदोलन

गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाईविरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेसचे आंदोलन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In