• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कंटेनरच्या जोरदार धडकेत प्रतिष्ठित शेतकरी ठार!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
कंटेनरच्या जोरदार धडकेत प्रतिष्ठित शेतकरी ठार!
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

बोगद्याच्या अभावी निष्पापाचा बळी; परिसरात संतापाची लाट

एरंडोल (प्रतिनिधी ) — राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका (कासोदा फाटा) येथे बोगद्याच्या अभावामुळे आणखी एका निष्पापाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता भरधाव कंटेनरच्या धडकेत एरंडोल येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा आरटीओ एजंट मंगेश शिवदास पाटील (वय ६६, रा. पाटीलवाडा, एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला.

RelatedPosts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पाटील हे आपल्या दुचाकीने (क्र. MH 19 DX 1094) शेताकडे जात असताना अमळनेर नाका परिसरातील कासोदा फाटा क्रॉसिंग ओलांडत होते. यावेळी जळगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (क्र. DD 01 S 9103) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. मात्र, अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून पळून गेला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही वेळातच चालकाला ताब्यात घेतले आहे.

मंगेश पाटील हे एरंडोल येथील सन्माननीय व समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पाटीलवाडा परिसरासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.

दरम्यान, कासोदा फाटा (अमळनेर नाका) हे ठिकाण सध्या अपघाताचे केंद्र बनले आहे. येथे बोगदा नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या ठिकाणी बोगदा उभारण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

“प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज एका प्रतिष्ठित नागरिकाला जीव गमवावा लागला. याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध कारवाई होणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील करीत आहेत.

Tags: Vivek Mahale
Previous Post

कंदर येथील गोरख देवकर यांचे निधन

Next Post

रमजान ईद निमित्त प्रशांत राठोड यांचा सर्वधर्मीय संवाद

Related Posts

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
6
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
7
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
10
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
10
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
Next Post
रमजान ईद निमित्त प्रशांत राठोड यांचा सर्वधर्मीय संवाद

रमजान ईद निमित्त प्रशांत राठोड यांचा सर्वधर्मीय संवाद

ताज्या बातम्या

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In