• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवना टाकळी प्रकल्पाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडवर; ९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी तातडीचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवना टाकळी प्रकल्पाबाबत विखे पाटील ॲक्शन मोडवर; ९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी तातडीचे आदेश
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

वैजापूर / प्रतिनिधी :

शिवना टाकळी सिंचन प्रकल्पातील कालव्याच्या रखडलेल्या कामावरून राज्याचे जलसंपदा मंत्री Radhakrishna Vikhe Patil ॲक्शन मोडवर आले असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करून यंदाच धोंदलगाव-दहेगाव परिसरात पाणी पोहोचवण्याचे कडक आदेश दिले आहेत.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

दि. २२ मार्च रोजी वैजापूर तालुक्यातील धोंदलगावसह परिसरातील ९ गावांतील शेतकऱ्यांनी लोणी येथे जाऊन मंत्री विखे पाटील यांची भेट घेत सविस्तर निवेदन सादर केले. शिवना टाकळी सिंचन प्रकल्पासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात कालव्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

निवेदनातील गांभीर्य लक्षात घेत मंत्री विखे पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता उपस्थितांसमोरच जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट फोन लावून जाब विचारला. “निधी मंजूर असूनही काम कासवगतीने का सुरू आहे? ९ गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी या सर्व गावांना पाणी मिळालेच पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

तसेच ठेकेदारांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे का, किंवा अन्य तांत्रिक अडचणी आहेत का, याचीही चौकशी करत काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “याच वर्षी पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचले पाहिजे,” अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.

या निवेदनासाठी धोंदलगाव, भायगाव गंगा, उंदिरवाडी, नालेगाव, अमानतपूरवाडी, संजरपूरवाडी, परसोडा, करंजगाव व दहेगाव या ९ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निधी असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे आमचे वर्ष वाया जाण्याची भीती होती, मात्र मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आता आमच्या पाणी प्रश्नाला गती मिळेल,” अशी अपेक्षा शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री विखे पाटील यांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे जलसंपदा विभागात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता प्रत्यक्षात कामाला किती वेग येतो आणि शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळते का, याकडे संपूर्ण वैजापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Nana Sable
Previous Post

के. के. महाविद्यालयात शहीद दिन उत्साहात साजरा

Next Post

भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी

भडगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन; भोंदू बाबावर कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In