• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई; ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, एकावर गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in Blog
0
हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई; ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, एकावर गुन्हा दाखल
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

नांदेड (प्रतिनिधी) : अवैध गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात हिमायतनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शेवाळ बाबा वाळीत परिसरात अवैध गुटखा व पानमसाल्याची साठवणूक करून विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

या कारवाईत सैय्यद सत्तार सैय्यद खालिद (वय ४८, रा. पोटा बु., ता. हिमायतनगर, जि. नांदेड) याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ४,८८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ‘गोवा १०००’ पानमसाला, केसरयुक्त वज्री, जी.आय. जर्दा, विविध ब्रँडचे पानमसाले, सुगंधित तंबाखू तसेच “मस्तानी २१६” व इतर प्रीमियम दर्जाचे तंबाखू उत्पादने यांचा समावेश आहे.

या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५२/२५ नुसार भारतीय दंड संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची नोंद दि. २४ मार्च २०२६ रोजी पहाटे करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक अमोल भगत, सपोनि विशाल वाठारे, पोहवा क्र. १२७२, चालक श्रेणी पोउपनि मिलिंद कात्रे, श्याम नागरगोजे, पोहवा क्र. २२०४ बालाजी पाटील, मपोशि क्र. ३३३१ सपना सूर्यवंशी आदींच्या पथकाने छाप्यात सहभाग घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुटखा व पानमसाल्यावर बंदी असतानाही काही ठिकाणी अवैधरित्या साठवणूक व विक्री सुरू असल्याने अशा प्रकरणांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून विठ्ठलराव कदम यांच्या शस्त्रक्रियेसाठी ११ लाखांची व्यवस्था

Next Post

किनवट नगर परिषदेची धडक कारवाई; थकबाकीदारांचे दोन गाळे सील

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post
किनवट नगर परिषदेची धडक कारवाई; थकबाकीदारांचे दोन गाळे सील

किनवट नगर परिषदेची धडक कारवाई; थकबाकीदारांचे दोन गाळे सील

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In