• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट नगर परिषदेची धडक कारवाई; थकबाकीदारांचे दोन गाळे सील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
किनवट नगर परिषदेची धडक कारवाई; थकबाकीदारांचे दोन गाळे सील
0
SHARES
95
VIEWS
Ad 1

३० मार्चपूर्वी कर भरा, अन्यथा जप्ती मोहीम तीव्र – मुख्याधिकारी मुगाजी काकडे

नांदेड (प्रतिनिधी) : किनवट नगर परिषद प्रशासनाने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलत शहरातील दोन व्यावसायिक गाळे सील केले. वारंवार सूचना देऊनही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारक, गाळेभाडे, जमीन भाडे तसेच पाणीपट्टी थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

नगर परिषद किनवट सध्या ‘ॲक्शन मोड’वर असून, जमीन भाडे, गाळे भाडे, मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम राबवली जात आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रशासनाने वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दि. २४ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शहरातील दोन मोठ्या थकबाकीदारांचे व्यावसायिक गाळे जप्त करून त्यांना सील ठोकण्यात आले. या कारवाईमुळे इतर थकबाकीदारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संदर्भात मुख्याधिकारी मुगाजी काकडे यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांनी कटू कारवाई टाळण्यासाठी ३० मार्च २०२६ पूर्वी आपल्या थकीत पाणीपट्टी, मालमत्ता कर, गाळे भाडे आणि जमीन भाड्याचा भरणा करावा. मुदतीत कर न भरल्यास संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची मोहीम आणखी तीव्र केली जाईल.”

या धडक कारवाईत नगर परिषदेचे कर विभाग प्रमुख घुले, संमुखराव, स्वानंद मामीलवाड, कैतवाड, राजू पिल्लेवार, परमेश्वर कचमोडे, अनिल माहूरकर, गंगाधर दोनपेलीवार यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी व पथक सहभागी होते.

आगामी आठवड्यात ही वसुली मोहीम शहरातील विविध भागांत अधिक तीव्रतेने राबवली जाणार आहे. जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी नागरिकांनी आजच थकीत कर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags: Sheikh Moien
Previous Post

हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई; ४.८८ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, एकावर गुन्हा दाखल

Next Post

पंढरपूर–कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
11
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
15
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
20
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
39
Next Post
पंढरपूर–कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

पंढरपूर–कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In