• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यात जीवघेणे गतिरोधक; विकी जाधव यांचे शासनाला निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यात जीवघेणे गतिरोधक; विकी जाधव यांचे शासनाला निवेदन
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

कल्याण प्रतिनिधी –

बदलापूर: महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये रस्त्यांवर उभारण्यात आलेले नियमबाह्य व धोकादायक गतिरोधक (Speed Breakers) नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचा गंभीर मुद्दा उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार व कायद्याचे अभ्यासक विकी कुंडलिक जाधव यांनी राज्य शासनाकडे अधिकृत निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

जाधव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गतिरोधक उभारण्यात आले असून त्यातील अनेक गतिरोधक हे कोणत्याही तांत्रिक निकषांचे पालन न करता, परवानगीशिवाय व चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.

या संदर्भात Bombay High Court यांनी Suo Motu Writ Petition (PIL) No. 3 of 2005 – Kewal Semlani vs Commissioner, Municipal Corporation of Greater Mumbai या प्रकरणात दिलेल्या आदेशाचा उल्लेख जाधव यांनी केला आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की राज्यातील सर्व गतिरोधक Indian Roads Congress (IRC) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार असणे बंधनकारक असून नियमबाह्य गतिरोधक हटविण्याचे आदेश आहेत.

तथापि, सदर न्यायालयीन आदेश असूनही राज्यात अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

जाधव यांनी Urban Development Department, Maharashtra कडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून पुढील मागण्या केल्या आहेत:

  • राज्यभर सर्व गतिरोधकांचे सर्वेक्षण करण्यात यावे
  • नियमबाह्य व धोकादायक गतिरोधक तात्काळ हटविण्यात यावेत
  • IRC निकषांनुसारच गतिरोधक उभारणी अनिवार्य करण्यात यावी
  • यासाठी तात्काळ शासन परिपत्रक (GR) काढण्यात यावे

या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा गंभीर विषय असून शासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आता या निवेदनावर शासन कोणती कार्यवाही करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Jogendra Jadhav
Previous Post

बीडमध्ये छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना ‘दामिनी’चा दणका; १९ जणांवर कारवाई

Next Post

सिंधुदुर्गात ताज समूहाचे पहिले ५ स्टार हॉटेल प्रकल्प: मंत्रालयात आढावा बैठक

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
0
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
10
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
14
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
18
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
8
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
38
Next Post
सिंधुदुर्गात ताज समूहाचे पहिले ५ स्टार हॉटेल प्रकल्प: मंत्रालयात आढावा बैठक

सिंधुदुर्गात ताज समूहाचे पहिले ५ स्टार हॉटेल प्रकल्प: मंत्रालयात आढावा बैठक

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In