• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवी मूल्यांचे संगोपन व संवर्धन करा : डॉ. अरविंद पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
मानवी मूल्यांचे संगोपन व संवर्धन करा : डॉ. अरविंद पाटील
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

वर्ध्यात ‘पथदर्शक साहित्य पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात

वर्धा (प्रतिनिधी) : “मानवी कल्याणासाठी साहित्याचा उपयोग झाला पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजविताना उद्देशाची स्पष्टता असणे अत्यावश्यक आहे. मानवी मूल्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. अरविंद पाटील यांनी केले.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

वर्धा येथील बजाज वाचनालय येथे पथदर्शी साहित्य संघ, विदर्भ प्रांत यांच्या वतीने आयोजित ‘पथदर्शक साहित्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा व ‘पथदर्शक’ या अनियतकालिकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सिद्धार्थ भगत आणि मार्शल धम्मा कांबळे उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ भगत यांनी “आंबेडकरी साहित्य निर्मितीची भूमिका” या विषयावर विचार मांडताना शिक्षणामुळे निर्माण झालेली सामाजिक जाणीव आणि कवितेद्वारे व्यक्त होणाऱ्या वेदना व प्रतिकार यावर भाष्य केले.
तर मार्शल धम्मा कांबळे यांनी “भारत राष्ट्र व्हिजन” या विषयावर बोलताना संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित राष्ट्र उभे केले असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात संजय ओरके यांनी आंबेडकरी साहित्याची दिशा ही माणसाच्या कल्याणासाठी असावी, असे मत व्यक्त केले.

या वेळी ‘राज्यस्तरीय पथदर्शक साहित्य पुरस्कार’ अंतर्गत सिराज करिम शिकलगार यांच्या ‘दिवान-ए-सिराज’ या गझलसंग्रहाला तसेच डॉ. अनंता सूर यांच्या ‘कोंडमारा’ या कथासंग्रहाला प्रत्येकी १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शेला व रोपटे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात ‘पथदर्शक’च्या नवव्या अंकाचे प्रकाशन तसेच क्यूआर कोडचे उद्घाटनही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रोशन गजभिये यांनी केले, तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले.

या सोहळ्यास साहित्यिक, वाचक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

अहेरी बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम यांचे पद धोक्यात?

Next Post

शालेय पोषण आहारासाठी गॅस पुरवठा सुरळीत करा : शरदराव लोहकरे पाटील यांची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
शालेय पोषण आहारासाठी गॅस पुरवठा सुरळीत करा : शरदराव लोहकरे पाटील यांची मागणी

शालेय पोषण आहारासाठी गॅस पुरवठा सुरळीत करा : शरदराव लोहकरे पाटील यांची मागणी

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In