• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फिरगाईनगर येथे बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास; करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 27, 2026
in क्राईम
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील फिरगाईनगर (दुधाट फ्लोटिंग परिसर) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार अमोल जाधव (वय २१, रा. सिद्धार्थनगर, करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, फिरगाईनगर येथे त्यांचे रो-हाऊस असून कुटुंबीय अधूनमधून तेथे राहत असतात. घरात जुनी पितळेची भांडी तसेच साखरपुड्यासाठी खरेदी केलेले कपडे ठेवण्यात आले होते.

RelatedPosts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

दि. २४ मार्च रोजी दुपारी तक्रारदारांचे नातेवाईक वैभव शेलार हे संबंधित घराकडे गेले असता, घराच्या पुढील दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ याबाबत तक्रारदारांना माहिती दिली. तक्रारदारांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले. शेजाऱ्यांकडून चौकशी केली असता मागील दोन दिवसांपासून घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची माहिती समोर आली.

या घरफोडीत सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे कपडे (साड्या, शर्ट पीस, पॅंट पीस), १५ हजार रुपये किमतीची पितळेची भांडी (पाण्याचा बंब, डिनर सेट, घागर, कळशी आदी) तसेच १० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

ही घटना दि. २१ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून ही घरफोडी केली आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Sachin Nalwade
Previous Post

चौफुला (ता. दौंड) येथे श्रीराम नवमी उत्साहात; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

Next Post

“चार दिवस गॅस नाही; ‘सर्व सुरळीत’ दाव्यावर प्रश्नचिन्ह – नागरिकांचा संताप!”

Related Posts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
103
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
15
क्राईम

श्रीगोंद्यात भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमीला पुण्यात हलवले

July 12, 2026
198
Next Post
“चार दिवस गॅस नाही; ‘सर्व सुरळीत’ दाव्यावर प्रश्नचिन्ह – नागरिकांचा संताप!”

“चार दिवस गॅस नाही; ‘सर्व सुरळीत’ दाव्यावर प्रश्नचिन्ह – नागरिकांचा संताप!”

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In