• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 31, 2026
in Blog
0
पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

पालम | प्रतिनिधी :
पालम तालुक्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या घराघरात पाणी पुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, या योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दि. २८ मार्च २०२२ पासून या योजनेच्या कामास सुरुवात झाली असली तरी अनेक गावांमध्ये आजपर्यंत पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. कामाच्या दरम्यान कोणतेही अधिकारी किंवा अभियंते प्रत्यक्ष पाहणीसाठी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी अनेक ठिकाणी अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे समोर येत आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध असूनही कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे कामे रखडल्याचे चित्र आहे. पवार कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून काम सुरू असूनही ग्रामस्तरावर पुरेशी हालचाल नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. सुमारे १ कोटी ६७ लाख रुपयांच्या या योजनेचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असून, स्वच्छ व फिल्टर पाणी नागरिकांना कधी उपलब्ध होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली असता बजेट नसल्याचे कारण सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष वाढला आहे. अनेक गावांतील नागरिकांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली असून, अन्यथा उपोषणाचा इशाराही दिला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous Post

ग्राहकांनी खरेदी करताना सतर्क राहावे; जागतिक ग्राहक दिनानिमित्त पालम तहसील कार्यालयात जनजागृती

Next Post

डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; पुण्यात भव्य सन्मान

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
6
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
5
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
10
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
6
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; पुण्यात भव्य सन्मान

डॉ. रोहित परीट यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’; पुण्यात भव्य सन्मान

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In