• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धार्मिक स्थळांच्या विकासाला प्राधान्य; श्री मलयाप्पा मंदिर कळशारोहण सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
धार्मिक स्थळांच्या विकासाला प्राधान्य; श्री मलयाप्पा मंदिर कळशारोहण सोहळा उत्साहात
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर मतदारसंघातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला असून, आगामी काळातही या कामाला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केले. ते नांवदी (ता. उदगीर) येथील श्री मलयाप्पा मंदिराच्या कळशारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध गावांमधील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी काम करण्यात आले आहे. श्री मलयाप्पा मंदिराला ये-जा करण्यासाठीचा रस्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरच विकसित केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

RelatedPosts

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, “आपल्याला समृद्ध धार्मिक वारसा लाभला आहे. भक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती असून, ईश्वराच्या नामस्मरणातून मनाला शांती आणि ऊर्जा मिळते.” त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री मलयाप्पा मंदिरात दर्शन घेऊन प्रार्थना केल्याचेही सांगितले.

“जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मला दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. ‘जे जे नव ते ते उदगीरला हवं’ या ध्येयाने काम करत विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार,” असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच ब्रह्मजी केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच उदगीर व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Kamlakar mule
Previous Post

मापोली परिसरात गारपिटीचा हाहाकार; स्ट्रॉबेरीसह कांदा पिकांचे लाखोंचे नुकसान

Next Post

भक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम; नावंदीतील हरिनाम सप्ताहात ‘डिजिटल शेतीशाळा’ उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
4
ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
9
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
19
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
12
Next Post
भक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम; नावंदीतील हरिनाम सप्ताहात ‘डिजिटल शेतीशाळा’ उत्साहात

भक्ती आणि तंत्रज्ञानाचा संगम; नावंदीतील हरिनाम सप्ताहात ‘डिजिटल शेतीशाळा’ उत्साहात

ताज्या बातम्या

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In