• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिवच्या आर्थिक कायापालटासाठी १०८ उद्योजक घडवण्याचा संकल्प; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिवच्या आर्थिक कायापालटासाठी १०८ उद्योजक घडवण्याचा संकल्प; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील तरुणांना स्वावलंबी बनवून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून २०२६-२७ या आर्थिक वर्षात १०८ नवीन उद्योजक घडवण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमांतर्गत केवळ उद्योग सुरू करण्याचे मार्गदर्शनच नव्हे, तर तो यशस्वीपणे उभा राहावा यासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. उद्योगासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करून देणे, बँकांमार्फत सुलभ कर्ज व अनुदान मिळवून देणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही मदत केली जाईल.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असून, इच्छुकांच्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या मोहिमेत कृषी आधारित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये शेळीपालन, कडबाकुट्टी, कांदा व चिंच पावडर निर्मिती, प्लास्टिक रिसायकलिंग, बायोमास इंधन, अगरबत्ती निर्मिती, इ-वेस्ट व लिथियम बॅटरी स्क्रॅप रिसायकलिंग, तसेच कोकोपीट व पारंपरिक उद्योगांचा समावेश आहे.

या योजनेसाठी इच्छुकांनी १ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान 8888627777 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप किंवा संदेशाद्वारे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी ‘प्रतिष्ठान भवन, धाराशिव’ येथे विशेष परिषद आयोजित करण्यात येणार असून, निवड झालेल्या उद्योजकांना पुढील दिशा दिली जाणार आहे.

“तरुणांनी नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनावे,” या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात हजारो कुटुंबांना रोजगार मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

SIR मोहिमेतील कामकाजावर नाराजी; धाराशिवमध्ये नगरसेवकांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांचा उपक्रम; कळंब-डिकसळ परिसरात दयावान प्रतिष्ठानचा पुढाकार

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
58
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
22
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
33
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांचा उपक्रम; कळंब-डिकसळ परिसरात दयावान प्रतिष्ठानचा पुढाकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्या प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांचा उपक्रम; कळंब-डिकसळ परिसरात दयावान प्रतिष्ठानचा पुढाकार

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In