• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीरमध्ये लाचखोरीवर मोठी कारवाई; पोलिस अधिकारी जाळ्यात अडकले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in क्राईम
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

लातूर (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. आरोपींनी गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तब्बल ३ लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या बदल्यात आरोपींनी लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता लाचेची मागणी सत्य असल्याचे निष्पन्न झाले.

RelatedPosts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

दि. २ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी राहुल बाबूराव नागरगोजे यांनी पंचासमक्ष ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम त्यांनी पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या वतीने स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. लाच स्वीकारल्यानंतर आरोपींनी फोनद्वारे एकमेकांशी संपर्क साधून व्यवहाराची खात्रीही केली.

कारवाईदरम्यान नागरगोजे यांच्याकडून ४५ हजार रुपये व मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला, तर पुजारी यांच्या अंगझडतीत मोबाईल हँडसेट मिळून आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करत आहेत.

या घटनेमुळे उदगीर परिसरात खळबळ उडाली असून, लाचखोरीविरोधातील कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Tags: Chandrakant shinde
Previous Post

कोळपेवाडी पंचक्रोशीत गॅस टंचाईचा तीव्र फटका; नागरिक आंदोलनाच्या तयारीत

Next Post

करमाळ्यात घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त

Related Posts

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
100
क्राईम

अन्यायग्रस्त महिलेची पती-पत्नीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी

September 27, 2026
90
ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
19
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
109
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
Next Post

करमाळ्यात घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In