• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह १७.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा पोलिसांची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह १७.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

शहादा, दि.०४ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर शहादा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १७ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई प्रकाशा गावाजवळ करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.४ एप्रिल) सकाळी सुमारे ९.१० वाजता तळोदा-प्रकाशा रोडवरील हॉटेल तापी परिसरात संशयित आयशर वाहन (क्र. MH 18 BG 9509) पोलिसांना आढळले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने साठवलेला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पोलिसांनी कारवाईदरम्यान युवा गोल्ड ३५ तंबाखू (२०० ग्रॅम) ९०० पाकिटे (किंमत ८१ हजार रुपये), युवा गोल्ड ३५ तंबाखू (४० ग्रॅम) ४५०० पाकिटे (किंमत १ लाख ८० हजार रुपये) आणि आयशर वाहन (किंमत १५ लाख रुपये) असा एकूण १७ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुषार किशोर देवरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोकुळ पितांबर शिंदे (वय २७, रा. खोरी, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, सपोनि संदीप वाघ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

ॲड. जे. पी. कुवर यांची शहादा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड; सर्वत्र अभिनंदन

Next Post

शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कीर्तन सोहळा संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
6
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
99
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
43
Next Post
शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कीर्तन सोहळा संपन्न

शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कीर्तन सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In