• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे गुजर नाभिक समाजाची सर्वसाधारण सभा व देवी उत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा येथे गुजर नाभिक समाजाची सर्वसाधारण सभा व देवी उत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) :
समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ, शहादा विभागाची सर्वसाधारण सभा व देवी उत्सव चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. संत सेना नाभिक समाज भवन, रामदेव बाबा नगर, शहादा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे अध्यक्ष भूषण राजाराम पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय गुजर नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव मक्कन जांभळे, संत सेना समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक भबुता सोनवणे, नगरसेविका ममता हेमराज पवार, आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार, शिक्षण समितीचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील विविध मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमाची सुरुवात नाभिक समाजाची कुलस्वामिनी लिंबच माता व आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व आरतीने झाली. यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल ममता हेमराज पवार यांना समाज-रत्न पुरस्कार, अशोक भबुता सोनवणे यांना समाज-भूषण पुरस्कार, तर भूषण राजाराम पवार यांना युवा-प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनेही ममता पवार यांना समाज गौरव पुरस्कार व भूषण पवार यांना युवा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावर्षीच्या सभेत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ७५ वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश केलेल्या ५२ ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. हिरालाल बोरदेकर व उद्धव मक्कन जांभळे यांच्यासह ज्येष्ठांना प्रमाणपत्र, भगवद्गीता व भगवान श्रीरामाचा स्कार्फ देऊन गौरविण्यात आले. तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण झालेल्या जगदीश सोलंकी यांचाही सत्कार करण्यात आला.

सभेत समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक एकोपा वाढवणे आणि समाजहिताचे विविध विकास उपक्रम राबविणे याबाबत ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी उद्धव जांभळे, प्रा. सुभाष सोनवणे, ममता पवार, प्रा. डॉ. अनिल साळुंके, अशोक सोनवणे, हिरालाल बोरदेकर, जगदीश सोलंकी, परमेश्वर चव्हाण व हेमराज पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूषण पवार यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. गणेश कन्हैया यांनी केले तर आभार संजय बोरदेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शहादा विभागीय पंच, कार्यकारिणी सदस्य व समाजबांधवांनी विशेष सहकार्य केले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांवर गुन्हा

Next Post

डॉ. आम्रपाली महिरे यांचे ‘बीडीएस’ परीक्षेत उज्ज्वल यश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
57
Next Post
डॉ. आम्रपाली महिरे यांचे ‘बीडीएस’ परीक्षेत उज्ज्वल यश

डॉ. आम्रपाली महिरे यांचे ‘बीडीएस’ परीक्षेत उज्ज्वल यश

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In