• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वतःची काळजी घ्या बाबा..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वतःची काळजी घ्या बाबा..
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

बापासाठी आपली लेक हे त्याचं सर्वस्व असतं. पण याच बापाला ‘स्वतःची काळजी घ्या’ असं सांगून एका २४ वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात समोर आली आहे.
मानसिक छळ आणि खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीला कंटाळून माधवी नावाच्या तरुण शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हाताच्या तळव्यावर ‘Take Care पापा’ असं लिहिलं होतं, जो तिचा शेवटचा संदेश ठरला.

नेमकं प्रकरण काय?

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

माधवी ही पामुरु येथील एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. नोकरीदरम्यान तिची ओळख नागुर भाषा नावाच्या तरुणाशी झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळाने माधवीला नागुरबद्दल एक धक्कादायक सत्य समजले. नागुर हा आधीच विवाहित असून त्याला मुलंही आहेत, हे समजताच माधवीने त्याच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली.

खासगी फोटोंचा धाक आणि ब्लॅकमेलिंग

माधवीने नातं तोडल्यामुळे नागुर संतापला होता. त्याने माधवीला धमकावण्यास सुरुवात केली. दोघांच्या एकत्र असलेल्या वेळचे काही वैयक्तिक आणि आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. आपल्यामुळे वडिलांची आणि कुटुंबाची समाजात बदनामी होईल, या भीतीने माधवी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. याच दबावातून तिने घरात कुणी नसताना टोकाचे पाऊल उचलले.

हातावर लिहिला शेवटचा संदेश

माधवीने आयुष्य संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळव्यावर ‘Take Care पापा’ असे लिहिले. आपल्या वडिलांवर तिचं किती प्रेम होतं आणि आपली बदनामी झाल्यावर त्यांना होणारा त्रास तिला बघवला नसता, हेच या शब्दांतून अधोरेखित होत आहे. तिने गळफास घेतल्याचे समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माधवीच्या मृत्यूला नागुर भाषा हाच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका सुशिक्षित मुलीला अशा प्रकारे आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Tags: Shrikant Dhokte
Previous Post

कन्नडमध्ये मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पत्रकारांच्या हक्कासाठी परभणीत मंगळवारी धरणे आंदोलन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

पत्रकारांच्या हक्कासाठी परभणीत मंगळवारी धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In