• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

व्यसनमुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
व्यसनमुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

एरंडोल : नशामुक्त भारत अभियानांतर्गत एरंडोल शहरात विविध जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडले. युवक हे देशाचे भविष्य असून त्यांनी व्यसनापासून दूर राहून व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संघटित प्रयत्न करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी केले.

सामाजिक न्याय मंत्रालय, भारत सरकार व सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद जळगावच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने तसेच संजीवन व्यसनमुक्ती केंद्र, एरंडोल यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यावेळी बोलताना त्यांनी व्यसनाधीनता ही देशासमोरील गंभीर समस्या असल्याचे सांगत, नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी दादाजी जाधव, समाज कल्याण कार्यालय अधीक्षक टी. एस. तडवी, समाज कल्याण निरीक्षक चेतन साळुंखे, माजी नगरसेवक विजय महाजन तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर बिराडे उपस्थित होते.

गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करत, व्यसनामुळे विविध आजारांचा धोका वाढतो व कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होते, असे सांगितले. व्यसन ही समाजाला लागलेली कीड असून त्याचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान जनजागृती स्टॉल, पथनाट्य, विविध स्पर्धा व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. लोककलेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. वहीगायन, गोंधळ व पथनाट्य सादर करून कलाकारांनी व्यसनाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडले. शाहीर विनोदी ढगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या मोहिमेत सुमारे १५० ते २०० युवकांनी नशामुक्ती संकल्पपत्र भरून व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे यांनी केले. यावेळी गोकुळ पाटील, हैबतराव पाटील, डॉ. प्रशांत पाटील, चिंतामण चौधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

चिचोंडी पाटीलमध्ये भीषण आग – 100 ते 150 एकर क्षेत्र जळून खाक

Next Post

जागतिक आरोग्य दिन विशेष: नंदुरबारच्या आरबीएसके पथकामुळे 5 महिन्यांच्या अक्षराला मिळाले जीवनदान; ३ लाखांची ओपन हार्ट सर्जरी मोफत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
23
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
51
Next Post
जागतिक आरोग्य दिन विशेष: नंदुरबारच्या आरबीएसके पथकामुळे 5 महिन्यांच्या अक्षराला मिळाले जीवनदान; ३ लाखांची ओपन हार्ट सर्जरी मोफत

जागतिक आरोग्य दिन विशेष: नंदुरबारच्या आरबीएसके पथकामुळे 5 महिन्यांच्या अक्षराला मिळाले जीवनदान; ३ लाखांची ओपन हार्ट सर्जरी मोफत

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In