• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक आरोग्य दिन विशेष: नंदुरबारच्या आरबीएसके पथकामुळे 5 महिन्यांच्या अक्षराला मिळाले जीवनदान; ३ लाखांची ओपन हार्ट सर्जरी मोफत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
जागतिक आरोग्य दिन विशेष: नंदुरबारच्या आरबीएसके पथकामुळे 5 महिन्यांच्या अक्षराला मिळाले जीवनदान; ३ लाखांची ओपन हार्ट सर्जरी मोफत
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ६ : “उद्याचे भविष्य असलेल्या बालकांचे आरोग्य सुदृढ राहिले, तरच जगाचे आरोग्य सुदृढ राहील” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उल्लेखनीय काम सुरू आहे. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत, शहादा तालुक्यातील शहाणा येथील ५ महिन्यांच्या अक्षरा नवीन पावरा या चिमुकलीवर मुंबईत यशस्वी मोफत ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली असून तिला नवजीवन मिळाले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरबीएसके पथक दुर्गम भागात बालकांची तपासणी करत असताना डॉ. राकेश पाटील व डॉ. उज्वला भामरे यांनी अंगणवाडी केंद्रात अक्षराची तपासणी केली असता हृदयविकाराचे प्राथमिक निदान झाले. आदिवासी व दुर्गम भागातील पालकांमध्ये शस्त्रक्रियेबाबत असलेली भीती दूर करणे हे मोठे आव्हान होते. पथकाने 2D इको, एक्स-रे व शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती देत समुपदेशन करून पालकांचा विश्वास संपादन केला. यासाठी स्थानिक सरपंच, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविकांचेही सहकार्य लाभले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

शासकीय योजनेचा आधार, मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया
अक्षराच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी डॉ. राकेश पाटील, डॉ. उज्वला भामरे, भाग्यश्री सोनार व मयुर निकुंभ यांनी विशेष प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी पूर्ण करून शहादा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश बर्डे व डॉ. मनिषा पाटील यांच्या सहकार्याने मुंबई येथील ‘केआयएमएस’ रुग्णालयात तज्ज्ञ डॉ. एल. श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे २.५ ते ३ लाख रुपये खर्चाची ही ओपन हार्ट सर्जरी पूर्णतः मोफत पार पडली. सध्या अक्षराची प्रकृती उत्तम असून तिच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आरबीएसके पथकाचा उल्लेखनीय टप्पा
गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या पथकाने आतापर्यंत ५१ हृदय शस्त्रक्रिया, २ कॉक्लियर इम्प्लांट आणि ९० इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. “पालकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. अजूनही काही बालके पालकांच्या नकारामुळे शस्त्रक्रियेपासून वंचित आहेत; त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे,” असे डॉ. राकेश पाटील व डॉ. उज्वला भामरे यांनी सांगितले.

पालकांची भावना
“माझ्या मुलीला हृदयविकार असल्याचे समजल्यावर आम्ही खचलो होतो. पण डॉक्टरांनी आम्हाला धीर दिला आणि प्रत्येक टप्प्यावर मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज माझी मुलगी सुरक्षित आहे.”
— नवीन पावरा (अक्षराचे वडील, शहाणा)

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

व्यसनमुक्त समाजासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर

Next Post

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल; शहादा बस स्थानकावर पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
74
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
17
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
24
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
18
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
32
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल; शहादा बस स्थानकावर पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल; शहादा बस स्थानकावर पंखे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In