• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बंधारे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी; दोषींवर कठोर कारवाई करा – बिरसा फायटर्स

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1
Ad 1

अक्राणी (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थी ब्रायन राहूल गावीत यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले असून तहसीलदार तळोदा यांनाही सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, युवराज वळवी, रतीलाल पावरा, मंगला बाई पवार, मनेश खर्डे, अंजनाबाई खर्डे, करण रावताळे, हिंमत नावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रायन गावीत हा विद्यार्थी ३ एप्रिल २०२६ रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर ४ एप्रिल रोजी शाळेच्या हद्दीतील टाकीत त्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालकांनी या प्रकरणात घातपाताची शंका व्यक्त केली आहे.

शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात येत असून आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अटक करावी आणि सेवेतून निलंबित करावे, अशी ठाम मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

कुंडलवाडी शहरात भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा; ७५ जणांचा पक्षप्रवेश

Next Post

गवंडगाव ग्रामस्थांकडून खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा सत्कार; पाणीप्रश्न सुटल्याने समाधान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
गवंडगाव ग्रामस्थांकडून खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा सत्कार; पाणीप्रश्न सुटल्याने समाधान

गवंडगाव ग्रामस्थांकडून खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा सत्कार; पाणीप्रश्न सुटल्याने समाधान

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In