• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किल्ले पारगडवर रंगणार ‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’; ३ हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
किल्ले पारगडवर रंगणार ‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’; ३ हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

चंदगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले पारगड येथे ‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ७ जून २०२६ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा तब्बल ३ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होण्याची शक्यता आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धनासोबतच ऐतिहासिक वारशाची जाणीव नव्या पिढीला करून देणे हा आहे. ‘निसर्गाचे रक्षक’ या संकल्पनेतून वृक्षलागवड, पाणी संवर्धन, कचरा पुनर्वापर आणि नैसर्गिक ऊर्जेचा वापर यांसारख्या मुद्द्यांवर जनजागृती केली जाणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’ (५ किमी), ‘जंगल ड्रीम रन’ (१० किमी) आणि ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ (२१ किमी) अशा तीन गटांत होणार असून पुरुष व महिलांसाठी १८ स्वतंत्र वयोगट ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार असून ७ जून रोजी सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.

५ ते ७ जून दरम्यान गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जून रोजी प्लास्टिकमुक्त अभियान व पर्यावरण जनजागृती सत्र, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा, पारंपरिक मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून ‘कोअर हेरिटेज’ संस्थेमार्फत राकेशराव धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या स्पर्धेला स्टॉफ इंडियाचे सीईओ बिपीन चिर्मुरे, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील तसेच वन विभाग, पोलीस प्रशासन व विविध क्रीडा संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र, पदक, टी-शर्ट आणि फळझाडाचे रोपटे दिले जाणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी www.pargad.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिर्मुरे आणि सल्लागार सदस्य श्रीकांत पाटील यांनी केले आहे.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

व्यंकटराव महाविद्यालयाच्या साधना व मधुरा यांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Next Post

किनगाव येथे टोलविरोधात रास्ता रोको; अपूर्ण रस्त्यावर वसुलीविरोधात नागरिकांचा संताप

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
किनगाव येथे टोलविरोधात रास्ता रोको; अपूर्ण रस्त्यावर वसुलीविरोधात नागरिकांचा संताप

किनगाव येथे टोलविरोधात रास्ता रोको; अपूर्ण रस्त्यावर वसुलीविरोधात नागरिकांचा संताप

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In