• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय जागेवरील अतिक्रमण व प्रदूषण प्रकरणात महसूल व इतर विभागांची हालचाल वाढली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
शासकीय जागेवरील अतिक्रमण व प्रदूषण प्रकरणात महसूल व इतर विभागांची हालचाल वाढली
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

अहिल्यानगर : उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर भाग यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, चिचोंडी पाटील परिसरातील शासकीय जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमण, विनापरवाना लाकूड कापणी व साठा, तसेच पर्यावरणीय व ध्वनी प्रदूषणाच्या गंभीर तक्रारींवर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.
आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची दखल घेत विविध विभागांना तत्काळ चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात महसूल विभागासह पोलीस प्रशासन, ग्रामविकास विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना संयुक्तपणे तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी शासकीय जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले असून विनापरवाना लाकूड कापणी व साठा केला जात आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच ध्वनी प्रदूषणाचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याची बाबही समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमित जागेवर उभारण्यात आलेले गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे समोर आले असून, शासकीय मालमत्तेचा व्यावसायिक वापर होत असल्याची बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
महसूल विभागाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून अतिक्रमण हटविणे, संबंधितांची नोंद घेणे आणि गाळ्यांच्या भाडेव्यवहारांची पडताळणी करून कायद्यानुसार पुढील कारवाई करणे अपेक्षित आहे. पोलीस विभागाला कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच या प्रकरणातील आर्थिक गैरप्रकारांची चौकशी करण्याची जबाबदारी देण्यात आली असून, ग्रामविकास विभागाला स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळालाही पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन तपासून आवश्यक ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

प्रशासनाकडून संबंधित विभागांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये या कारवाईबाबत उत्सुकता असून, शासकीय जागेचे संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरम्यान, तक्रारदारांनी या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Ad 1
Tags: Ganesh Ingle
Previous Post

पुण्यात दारुड्या चालकाला पोलिसांनी भररस्त्यात पकडले

Next Post

डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नांदेड च्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तनूष शाम साहू यांनी सिल्व्हर मेडल पटकावलं

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नांदेड च्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तनूष शाम साहू यांनी सिल्व्हर मेडल पटकावलं

डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत नांदेड च्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तनूष शाम साहू यांनी सिल्व्हर मेडल पटकावलं

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In