• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर; नागपूर ते पणजी प्रवास, पण नुकसान भरपाईचा पेच कायम!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा मंजूर; नागपूर ते पणजी प्रवास, पण नुकसान भरपाईचा पेच कायम!
0
SHARES
58
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

​कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ‘ड्रीम प्रोजेक्ट’ समजल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा अखेर समोर आला आहे. या नवीन आराखड्यानुसार महामार्गाच्या मार्गात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असले, तरी अद्याप नुकसान भरपाईची रक्कम जाहीर न झाल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा आणि चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, सुधारित आराखड्यालाही ‘शक्तीपीठ विरोधी कृती समिती’ने आपला विरोध कायम ठेवला आहे.
​व्याघ्र प्रकल्पावरून जाणार मार्ग; पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर
​सुधारित आराखड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा महामार्ग आता व्याघ्र प्रकल्पाच्या जवळून जाणार आहे. यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पर्यावरणप्रेमींनी या बदलावर नाराजी व्यक्त केली आहे.

​विरोध करणाऱ्या गावांना दिलासा, पण नवा संघर्ष सुरू
​पूर्वीच्या आराखड्याला ज्या गावांनी तीव्र विरोध दर्शवला होता, त्यातील बहुतांश गावे सुधारित आराखड्यातून वगळण्यात आली आहेत. मात्र, तरीही अंमलबजावणी यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सावध भूमिका घेतली आहे. कृती समितीचा विरोध पाहता, महामंडळाने अजूनही हा आराखडा अधिकृतपणे सार्वजनिक केलेला नाही.
​प्रवासाचा शेवट आता थेट गोव्याच्या राजधानीत
​शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात नागपूरपासूनच होणार आहे, यात कोणताही बदल नाही. मात्र, यापूर्वी हा महामार्ग गोवा-पत्रादेवी येथे संपणार होता, आता तो थेट पणजी पर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ही’ गावे होणार बाधित
​सुधारित आराखड्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बाधित होणाऱ्या गावांची यादी खालीलप्रमाणे आहे:
​हातकणंगले: जुने पारगाव, नवे पारगाव.
​पन्हाळा: वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.
​करवीर: केर्ली, केर्ले, पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपीरे, कापार्डे, कुडीत्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, हसूर दुमाला, भाटणवाडी.
​राधानगरी: राशिवडे बुद्रूक, चंदे, येळवडे, कोदवडे, वाघवडे, मोहडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.
​कागल: बोरवडे, उंदरवाडी.

​भुदरगड: नाथवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुली, मेघोली.
​आजरा: हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोळ, मसोली, देऊळवाडी.
​चंदगड: बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर.
​नुकसान भरपाईकडे लक्ष
​शासनाने आराखडा मंजूर केला असला, तरी शेतकरी आणि जमीन मालकांना त्यांच्या जमिनीच्या बदल्यात किती मोबदला मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. “जोपर्यंत योग्य मोबदला आणि पर्यावरणाचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा पवित्रा कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना प्रशासनाचा कस लागणार आहे.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

एकाच कुटुंबात ‘अधिकारी’ त्रिकूट! आजऱ्याच्या बुरुडे येथील प्राजक्ता कांबळेची विक्रीकर सहाय्यकपदी निवड

Next Post

आजऱ्यात अमली पदार्थांविरोधात एल्गार; कठोर कारवाईसह जनजागृती करण्याची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
आजऱ्यात अमली पदार्थांविरोधात एल्गार; कठोर कारवाईसह जनजागृती करण्याची मागणी

आजऱ्यात अमली पदार्थांविरोधात एल्गार; कठोर कारवाईसह जनजागृती करण्याची मागणी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In