• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘झाडांची भिशी’ उपक्रमांतर्गत १५० हून अधिक वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
91
VIEWS
Ad 1
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

सकल मराठा परिवार फाउंडेशन आणि राम राज ग्लोबल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘झाडांची भिशी – जुलै २०२६’ या उपक्रमाचे आयोजन १० जुलै रोजी हिंदुस्थान नगर, आडगाव येथील राम राज ग्लोबल कॉलेजमध्ये उत्साहात करण्यात आले.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

उपक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने करण्यात आली. तसेच नाशिकचे ‘ट्रीमॅन’ म्हणून ओळखले जाणारे व महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झालेले शेखर गायकवाड यांचा सकल मराठा परिवार आणि राम राज ग्लोबल कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शेखर गायकवाड आणि राम खुर्दळ यांनी योग्य पद्धतीने वृक्षारोपण, योग्य प्रजातींची निवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. सकल मराठा परिवाराचे खंडू आहेर यांनी महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देत समाजहितासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

राम राज ग्लोबल कॉलेजचे रामकृष्ण घायाळ आणि हर्षदा घायाळ यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देत या अभियानाला पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.

या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत १५० हून अधिक वृक्षांची लागवड केली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

कार्यक्रमास शिवाजी धोंडगे (दारिमाता वृक्षमित्र परिवार), शिंदे सर, खंडू आहेर, प्रकाश बोराडे, डॉ. नितीन देशमुख, प्रवीण देशमुख, संजय काळे, ॲड. गौरव मोहिते, स्नेहलताई काळे, संजय झारोळे, धनाजी आगळे, चेतन लोखंडे, कैलास देशमुख, दिलीप साबळे, प्रमोद सूर्यवंशी, संकेत कोरडे, मनोज साठे, स्वप्नील भोकरे, धोंडीराम रायते, भूषण औटे, सनी शेवाळे यांच्यासह सकल मराठा परिवार आणि ‘झाडांची भिशी’ समूहाचे सदस्य उपस्थित होते.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. “हिरवेगार नाशिक घडविण्याचा आमचा संकल्प अविरत सुरू राहील,” असा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती; कृष्णा नदीची पाणीपातळी घटली, जनजीवनाला दिलासा

Next Post

पूर ओसरला; रायगड जिल्ह्यात आता दूषित पाण्याचे संकट, जलजन्य आजारांचा धोका वाढला

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
19
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
10
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
21
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
18
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post

पूर ओसरला; रायगड जिल्ह्यात आता दूषित पाण्याचे संकट, जलजन्य आजारांचा धोका वाढला

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In