• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संशयास्पद इनोव्हा अपघातामागे गोवंश चोरीचं मोठं रॅकेट? वरिष्ठांनी लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1
Ad 1

परतूर |
परतूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडलेला इनोव्हा गाडीचा अपघात हा केवळ अपघात नसून, एका मोठ्या गुन्हेगारी साखळीचा धागा असू शकतो, अशी गंभीर चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे. रात्री उशिरा भरधाव वेगाने धावणाऱ्या इनोव्हा गाडीने डिव्हायडरला जोरदार धडक दिल्यानंतर समोर आलेल्या बाबींनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
अपघातग्रस्त गाडीची पाहणी करताना तिच्या मागील सीट काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. एवढेच नव्हे, तर गाडीत वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट आढळल्यामुळे हा प्रकार नियोजित आणि संशयास्पद असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या गाडीचा वापर गोवंश चोरीसाठी केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाईला विषारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून गाडीत टाकण्यात येत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसल्याचीही चर्चा आहे. मागील काही दिवसांत परतूर शहर व परिसरातून गाई चोरी होण्याच्या वाढत्या घटनांमुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.
अपघातानंतर गाडीतील चालक व इतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, या गंभीर प्रकरणात अद्याप ठोस कारवाई किंवा स्पष्ट तपासाची दिशा दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तब्बल दहा दिवस उलटूनही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही, ही बाब अधिक चिंताजनक ठरत आहे.

“या प्रकरणाचा सखोल तपास झाला, तर मोठे मासे गळाला लागू शकतात,” अशी चर्चा जोर धरत आहे. त्यामुळेच हा तपास कुठेतरी लालफितीत अडकला आहे का, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
परतूरकर नागरिकांनी आता थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शहरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला पूर्णविराम देण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी चालक व इतर संबंधितांविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून, पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी “तपास सुरू आहे,” असे सांगितले आहे.

Ad 1
Tags: Sachin Kate
Previous Post

मारुतीचे आडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, उद्या सांगता

Next Post

जिंती गावाचा सुपुत्र सीमाशुल्क निरीक्षक पदावर विराजमान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

जिंती गावाचा सुपुत्र सीमाशुल्क निरीक्षक पदावर विराजमान

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In