• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात शांतता कमिटीची बैठक उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१२(प्रतिनिधी)
येणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहादा पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी दुपारी पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्व धर्मीय बांधवांनी हा उत्सव समन्वयाने साजरा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, शांतता कमिटीचे सदस्य प्रा. एल.एस. सैय्यद, लोटनराव धोबी,ज्ञानेश्वर चौधरी, यादव कुवर, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, प्राचार्य मेहमूद खाटीक, वसीम तेली, आरिफ पिंजारी,मुनेशचंद्र जगदेव, अनिल भामरे, रमाशंकर माळी यांच्यासह पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर, रुपेश जाधव, हिरालाल रोकडे, ईश्वर पाटील, हर्षल सोनवणे, विष्णू जोंधळे, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत यांनी सांगितले,शहादा शहर नेहमीच शांतताप्रिय राहिले आहे. किरकोळ अपवाद वगळता सर्व सण येथे उत्साहात साजरे होतात. कायदा व सुव्यवस्था राखणे ही केवळ पोलिसांचीच नाही, तर नागरिकांचीही जबाबदारी आहे.
माजी नगरसेवक आरिफ पिंजारी म्हणाले,मिरवणुकीत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होतात. अशा वेळी काही विघातक प्रवृत्ती गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात. पोलीस प्रशासनाने अशा लोकांची वेळीच माहिती काढून त्यांना कडक सूचना द्याव्यात.
पत्रकार विष्णू जोंधळे यांनी म्हटले,उत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहाद्यातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्व नेहमीच सकारात्मक विचार करते, त्यामुळे मिरवणुकीत सर्वजण एकत्र येतील.
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल कुवर यांनी सांगितले,मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्ते सुव्यवस्थित करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. तसेच पुतळा परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागणे कदापि शक्य नाही.

प्राचार्य मेहमूद खाटीक म्हणाले ,उत्सवाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि इतरांनाही घेऊ दिला पाहिजे. बंधुभाव हाच सणांचा मुख्य उद्देश असावा.
प्रमुख मार्गदर्शक प्रा.मकरंद पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, म्हणाले की, महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे किंवा धर्माचे नसतात. त्यांच्या जयंतीला निमंत्रणाची वाट न पाहता सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, मात्र आपण संघटित होण्याऐवजी आपसात संघर्ष करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून नियमबाह्य वागणे चुकीचे आहे.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी उपस्थितांना आश्वस्त केले की,काही मोजक्या विघातक लोकांमुळे संपूर्ण शहराला किंवा समाजाला वेठीस धरू दिले जाणार नाही. शांतता कमिटीने मांडलेल्या समस्या आणि मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल. सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव आदर्श ठरेल.
या बैठकीला शांतता कमिटीचे सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

आदिवासी टायगर सेनेचा राज्य व सीमापार संघटना विस्ताराचा धडाका

Next Post

अथक परिश्रमातून यशाची शिखरे गाठली – अजय कचरे महसूल अधिकारी पदी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

अथक परिश्रमातून यशाची शिखरे गाठली – अजय कचरे महसूल अधिकारी पदी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In