• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

शेगाव | प्रतिनिधी :
ओम साई प्रतिष्ठान, शेगाव यांच्या वतीने राबविण्यात येणारी “विद्यार्थी दत्तक योजना – वर्ष तिसरे” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमांतर्गत गावातील २५ गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

RelatedPosts

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजी खिलारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैया ढोणे, डॉ. संभाजी देशमुख, शेगाव सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन धोंडीराम गुंडा माने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, उपाध्यक्ष अनुराधा निकम, सुभेदार मेजर शिवाजी बोराडे, केंद्रप्रमुख शेंडे सर, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, नवनाथ निकम, विशाल माने, धनाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ओम साई प्रतिष्ठानचे संचालक, महिला कार्यकारिणी सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.

मान्यवरांनी ओम साई प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविण्यात येणारी विद्यार्थी दत्तक योजना ही समाजोपयोगी असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष बबलू शिंदे यांनी सांगितले की, समाजातील दानशूर व्यक्ती, देणगीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, देणगीदार, पालक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांचे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले.

Ad 1
Previous Post

मेंडकी जिल्हा परिषद शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; नयन जनबंधू तालुक्यात प्रथम

Next Post

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

Related Posts

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण
Blog

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026
4
Blog

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
1
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
8
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा
Blog

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

October 11, 2026
33
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
22
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ
Blog

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
37
Next Post

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In