• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुसरा ध्रुवतारा होताना!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुसरा ध्रुवतारा होताना!
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

अंतराळात आधीच एक अढळ असा ध्रुव तारा असताना त्याच्याच कक्षेत फिरत राहून स्वत:ही ध्रुवपद प्राप्त करण्यास हिंमत लागते! खरं तर याच एकमेव ता-यात तिला स्वत:ला विलीन करून घेता आलं असतं…पण हा सोपा मार्ग तिनं निवडला नाही!
थोरली इतरांची आणि पुढे जगाचीही ‘दीदी’ झालेली असताना ‘ताई’ होणंही सोपं नव्हतं. छोट्या भावाची ती दुसरी आई झाली होतीच पण तिच्या नावापुढे जगाने ताई हा शब्द आपसूक उच्चारावा, अशी कामगिरीही तिने करून दाखवली!
आशा भोसले यांच्या एका प्रकट मुलाखतीमध्ये सुधीर गाडगीळ म्हणाले होते,”महाराष्ट्र दोनच भोसल्यांना ओळखतो….छत्रपती शिवाजी महाराज भोसले आणि आशा भोसले!” या विधानात काहीशी अतिशयोक्ती असली तरी यातून आशा भोसले यांनी विपरीत परिस्थितीत स्वत: कोरलेले स्वतंत्र राज्य मात्र निश्चित अधोरेखित होतं.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

लता आपल्या वडिलांच्या मंगेशकर आडनावास अखेरपर्यंत जपत राहिल्या आणि आशा यांच्या जीवनात त्यांच्या भोसले या आडनावाने कधी फारकत घेतली नाही. किंबहुना आशा आणि भोसले हे दोन शब्द एकच होऊन गेले होते.
विवाह,संसार यांतील तपशिलावरून व्यक्तीची, विशेषत: स्त्रीचे मूल्यमापन करणा-या आपल्या समाजव्यवस्थेत आशा यांच्या वैय्यक्तिक जीवनाबाबत अनेकवेळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बोलले,लिहिले गेले, पण त्या सगळ्याला आशाताई वाटेवरी काटे वेचित चाललो या विचाराने सामोरे जात राहिल्या. जीवनात अगदीच अनिवार्य नसला तरी आवश्यक असलेला आधार त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न करताना धोकेही पत्करले आणि त्याचे चांगले परिणाम उपभोगले आणि वाईट परिणाम भोगले!
चैन से हमको कभी आपने जीने ना दिया….असं म्हणताना त्यांचा आवाज कातर झालाही असेल पण विरह आणि प्रतारणा हे भोग आणि आशाताई अशी सांगड नियतीने घालून दिलेली असावी. हे सर्व पाठी असताना ओठी सुस्वर राखणे किती अवघड असेल….पण हीच किमया साधताना आशा भोसले नेहमीच दिसत राहिल्या! थोरल्या बहिणीसारखं दीर्घायुष्य लाभलेल्या आशाताई आयुष्याचं गाणंही लगबगीनं संपवून जीवनाच्या ध्वनिक्षेपकापासून दूर झाल्या!

मन क्यों बहका रे बह्का आधी रात को? या आशाताईच्या प्रश्नावर बेला महका रे महका असं उत्तर देत लतादीदी समरस होत गायल्या. इतरांच्या कुटुंबातील असलेल्या किंवा नसलेल्या बेबनावाचा सातत्याने शोध घेणा-या समाजाच्या कुजबुजी या दोघींच्या कानांवर गेल्या नसतील असं नाही….पण नावात दोन दोन अक्षरं असलेल्या या दोघींनी एकाचे दोन होतील, अशी विधानं कधी केली नाहीत. तुलना ही दोन समान गोष्टींत होत असते, हे लोक विसरले. त्यामुळे काल्पनिक कथांवर भलताच साज चढवला गेला! खरं तर लोकांनी गाण्याशी मतलब ठेवायला पाहिजे होता….तसं झालं नाही!
लतादीदी यांनी जितके श्वास घेतले तितकेच श्वास आशाताई यांनीही घेतले……पण श्वास घेणारी ही शरीरं वेगवेगळी होती. जिथं जगात कोणतीही गोष्ट ‘हूब हू’ भासू शकते पण असत नाही तसाच या दोघींचा स्वर. इथे तुलना अशक्यप्राय! ल म्हणजे लय आणि ता म्हणजे ताल अशी जुळणी करीत असताना आ म्हणजे आत्मविश्वास आणि शा म्हणजे शानदार असं काहीसं होऊ शकतं!
स्वत: संसारिक सुखाच्या शोधात असताना आशा ताई यांनी गाण्यातले सुख मात्र पुरेपूर घेतले आणि त्याहीपेक्षा श्रोत्यांना दिले. काळजात प्रचंड वेदना असताना त्या देहावर कधीच दिसून आल्या नाहीत. व्यक्तिमत्वाची श्रीमंती कुणाही मात्तबराला शोभेल अशीच ठेवली शेवटपर्यंत. सुन सुन दीदी तेरे लिये एक रिश्ता आया है…..या गाण्यातला खट्याळपणा एरव्हीच्या बोलण्यातही कायम ठेवला…..नक्कल केली ती दीदीच्या बोलण्याची….आवाजाची नव्हे…कारण आशा ताई स्वतंत्र ध्रुवतारा होत्या…..त्यांचे रसिकांच्या मनातल्या आभाळातले स्थान कायम राहील, यात शंका नाही. आता लता दीदीना स्वर्गात फुगडी खेळायला आणि केसांत फुले माळून घ्यायला एक हक्काची सवंगडी मिळाली! दीदी…ताई….भावपूर्ण श्रद्धांजली!

श्रीकांत रा धोकटे
(ठाणे शहर लोकप्रतिनिधी)

Ad 1
Tags: Shrikant Dhokte
Previous Post

भारतीय संगीत क्षेत्रातील लखलखता तारा निघून गेला; गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन

Next Post

कल्याण पूर्वेत चालमफियाबिल्दरची दादागिरीउघड घराचा नावाखाली लाखाची फसवणूक..

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
कल्याण पूर्वेत चालमफियाबिल्दरची दादागिरीउघड घराचा नावाखाली लाखाची फसवणूक..

कल्याण पूर्वेत चालमफियाबिल्दरची दादागिरीउघड घराचा नावाखाली लाखाची फसवणूक..

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In