• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी |

पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करत त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोत्साहन अनुदान देण्यात आले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. सरपंच राजेश शिरगरे, उपसरपंच सचिन दहाट तसेच शैलेश तलवारे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. गावातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यामध्ये कल्याणी नरेश टेटू हिने ९५ टक्के गुण मिळवत नोबेल किड्स कॉन्व्हेंटमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कल्याणी दिलीप वायरे हिने बारावीत ९३.६५ टक्के, संस्कार राहुल काळे याने दहावीत ८१ टक्के, रेहान खान शाहरुख खान पठाण याने बारावीत ८० टक्के, रितेश राजेश कावळे याने दहावीत ८१ टक्के आणि विवेक दिनेश वायरे याने दहावीत ८२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत, प्रोत्साहन अनुदानाचा धनादेश तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर्मी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलमताई बाबर, ज्येष्ठ पत्रकार सूर्यप्रकाश भट्टड तसेच पोलीस कर्मचारी रोशन करलुके उपस्थित होते.

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटी या गुणांच्या बळावरच यशाचे उच्च शिखर गाठता येते, असे सांगितले. शिक्षणात सातत्य राखून एकाग्रचित्ताने वाटचाल करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी जबाबदाऱ्यांचे भान ठेवून प्रगती साधण्याचा संदेशही देण्यात आला.

सरपंच राजेश शिरगरे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात मोठे यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत हेरोडे यांनी केले. कार्यक्रमास गावातील महिला मंडळी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शहादत खान पठाण, ममता टेटू, सुरेखा वायरे, राहुल काळे, अनिल माने, रेखा कावळे, सविता ठेवले, जयश्री तलवारे, शारदा लवटे, कविता मात्रे, मिलिंद कावळे, शेख अन्वेष, वसंत मंडवे, महेंद्र म्हात्रे, रंजना काळपांडे, अनु दहाट, शकुंतला भगत आदींची उपस्थिती होती.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

सेलू शहरात अवकाळी पाऊस व तुफानी वाऱ्याने मोठे नुकसान

Next Post

पिंप्राळा परिसरातील वीज खांब व केबल कामावर नागरिकांचा आक्षेप

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

पिंप्राळा परिसरातील वीज खांब व केबल कामावर नागरिकांचा आक्षेप

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In