• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘शक्तीपीठ’च्या रेखांकनामुळे येरळा काठ धास्तवला : अनेक शेतकरी भूमिहीन होणार….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘शक्तीपीठ’च्या रेखांकनामुळे येरळा काठ धास्तवला : अनेक शेतकरी भूमिहीन होणार….
0
SHARES
182
VIEWS
Ad 1
Ad 1

आंदोलनाची ठिणगी पडली : नेवरी ग्रामस्थ आक्रमक…..

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कडेगाव

‘शक्तीपीठ’ महामार्गाचे नवे रेखांकन झाले असून हा मार्ग आता कडेगाव तालुक्यातील नेवरी, वडियेरायबाग, शेळकबाव, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे असा पुढे पलूस वाळवा तालुक्यात कृष्णा नदीकाठच्या गावातून जात असल्याचे समोर आले आहे. वास्तविक पाहता कडेगाव तालुक्यातील हा सर्व भाग येरळा नदीकाठच्या सुपीक व बागायती शेतातून जात आहे. येरळा नदी, ताकारी, टेंभू व आरफळ योजनांच्या पाण्यामुळे इथली शेती बहरली आहे. हजारो युवक शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. आता कुठे शेतीला बरे दिवस येऊ लागले आहेत असे असताना आता हे शक्तीपीठ महामार्गाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसू पाहत असल्याने इथला शेतकरी चांगलाच धास्तवला आहे. मुळात हे रेखांकन कोणी व कसे केले हे समजत नाही. कारण हा शेतकरी अतिशय कमी शेती असणारा शेतकरी आहे, सरासरी दोन-पाच एकर किंवा त्याहीपेक्षा कमी शेती असणारा शेतकरी आहे.

या रेखांकनात अनेकजण भूमिहीन होण्याची भीती आहे. हातातील शेती गेल्यावर तरुणांनी काय करायचे आणि ही कुटुंब कशी जगतील असा प्रश्न आहे. येरळा काठचा हा भाग अतिशय कष्टाळू आहे. इथली द्राक्षे, ड्रॅगन फ्रूट, आले, हळद, केळी, भाजीपाला, फुले ही सातासमुद्रापार जात आहे. ऊस शेती अतिशय दर्जेदार केली जाते, पण या महामार्गाने सगळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. केवळ शेती च नव्हे तर शेतीपूरक अनेक व्यवसाय व उद्योगांवर यामुळे कुऱ्हाड कोसळणार आहे. तरुण बेरोजगार होणार आहेत तर अनेक कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. याविरोधात आवाज उठविण्यासाठी नेवरी ग्रामस्थांनी वज्र्यमूठ बांधली असून ग्रामस्थांनी कडेगाव तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत हा महामार्ग या परिसरातून रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी जमीन देण्यास सर्व शेतकऱ्यांनी एकमताने नकार देत शासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गासाठी स्थानिक पातळीवर कोणतीही मागणी नाही. तसेच, वाहतुकीसाठी इतर सक्षम पर्यायी मार्ग उपलब्ध असताना, पुन्हा एकदा या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवरच घाला घालू नये,
शासनाने या महामार्गाबाबत नेवरी गावात कोणतीही पुढील कार्यवाही करू नये आणि हा महामार्ग आमच्या हद्दीतून पूर्णतः रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा प्रकल्प मागे न घेतल्यास, प्रशासनाला शेतकऱ्यांच्या तीव्र जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

फोटो :
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन तहसीलदार अजित शेलार यांना देताना नेवरी ग्रामस्थ….

Ad 1
Previous Post

लोखंडी सावरगाव येथे भीषण अपघात; २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

धनेगावात मल्लिका देवी संस्थानचा चैत्र वद्य अष्टमी उत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

धनेगावात मल्लिका देवी संस्थानचा चैत्र वद्य अष्टमी उत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In