• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“सिमेंट रस्त्यांमुळे अकोल्यात उष्णतेचा उच्चांक?” – नागरिकांचा संताप, प्रशासनाला सवाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
“सिमेंट रस्त्यांमुळे अकोल्यात उष्णतेचा उच्चांक?” – नागरिकांचा संताप, प्रशासनाला सवाल
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

अकोला : उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यात यंदा उष्णतेचा पारा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्त होत असताना, सिमेंट रस्त्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे उष्णतेत भर पडत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

‘प्रगती’ आणि ‘आधुनिक पायाभूत सुविधा’ या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते बांधले जात असून, यामुळे नैसर्गिक वातावरणाचा समतोल बिघडत असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः कायम थंड वातावरण असलेल्या भागांसाठी योग्य असलेले सिमेंट रस्ते उष्ण प्रदेशात वापरणे हा चुकीचा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

नागरिकांच्या मते, या सिमेंट रस्त्यांमुळे उष्णता अधिक प्रमाणात साठून राहते, ज्यामुळे परिसरातील तापमान वाढते आणि उष्माघाताचा धोका वाढतो. भविष्यात याचा परिणाम विशेषतः वयोवृद्ध नागरिकांवर गंभीर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. “पर्यावरणाला बाधा पोहोचवून उष्णतेला आमंत्रण देणाऱ्या धोरणांवर अद्याप कार्यवाही का होत नाही?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

तसेच, कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करणाऱ्या संबंधित व्यवस्थापनाने, जर पर्यावरणीय परिणामांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई देण्याची मागणीही जोर धरत आहे.

जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व मा. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

— पंजाबराव खाडे, जि. प्रतिनिधी
“सारथी महाराष्ट्राचा”

Tags: Dr. Punjabrao Khade
Previous Post

“आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!”

Next Post

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ एप्रिलला

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post

उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ एप्रिलला

ताज्या बातम्या

चटणीत अळी; पुनर्तपासणीत झुरळांचा वावर; हॉटेल विसावाचा परवाना एफडीएकडून निलंबित; यापूर्वी १५ हजारांचा दंड करूनही सुधारणा नाही.

चटणीत अळी; पुनर्तपासणीत झुरळांचा वावर; हॉटेल विसावाचा परवाना एफडीएकडून निलंबित; यापूर्वी १५ हजारांचा दंड करूनही सुधारणा नाही.

September 4, 2026

◾आज श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस.

September 4, 2026

सेवेत प्रामाणिकपणा, वारकरी विचारांची साथ अन समाजसेवेची ओढ

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In