• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, महावीर पटवा आणि बाळासाहेब महाडिक उपस्थित होते.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी मान्यवरांचे स्वागत करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात बबनराव पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवा, संघर्ष आणि परिश्रम यांच्या जोरावरच मोठे यश मिळते,” असे सांगितले.

बाबासाहेब भोस यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या प्रगती मुसळे, प्रियंका दरवडे, यशोदा म्हस्के, निशांत एकमले, अश्विनी हिरडे, मनीषा कापसे, सावरी खडके, स्वप्निल चौधरी, क्रांती रसाळ, फुलाबाई पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अरबाज शेख (राज्य राखीव पोलीस बल), सौरव खळे (पॅरा कमांडो), प्रदीप गोडसे, नूतन वागस्कर, राहुल दरेकर (महसूल सहाय्यक), कु. संगीता आढाव (वसतिगृह अधीक्षक) आणि ऋषिकेश नांगरे (इंडियन आर्मी) यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी पॅरा कमांडो ऋषिकेश नांगरे यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. राजाराम कानडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले, तर कर्मवीर भाऊराव पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन प्रा. अनिल ढवळे यांनी आभार मानले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Next Post

धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम

धानोरा जि.प. शाळेची विद्यार्थिनी आर्या काळे ‘मंथन’ स्पर्धेत राज्यात द्वितीय; जिल्ह्यात प्रथम

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In