• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना कष्ट, शिक्षण आणि चिकाटीच्या बळावर जीवन यशस्वी करण्याचा संदेश दिला.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही आपल्या भाषणात फुले-आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजात झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र मौखिक साधन व संकलन अभियानाचे प्रमुख कृष्णा घोलप होते. त्यांनी “गुलामगिरी ते संविधान” या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत थोर पुरुषांना जातीत न विभागता त्यांच्या विचारांचे जतन करण्याचे आवाहन केले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून संविधानाच्या मूल्यांवर आधारित संस्कृती निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. थोर पुरुषांच्या विचारांचे वाचन व आचरण हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी बाळासाहेब महाडिक यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. राजाराम कानडे यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीर पटवा, सचिन महाडिक, योगेश भोसले, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, प्रा. रत्नाकर झिटे, प्रा. उषा बोरुडे, रासेयो प्रमुख प्रा. भाऊ बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, डॉ. राहुल गायकवाड, प्रा. कल्पना बागुल, प्रा. रमेश थोरात, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. हरिभाऊ वाघीरे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल ढवळे यांनी मानले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश

Next Post

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
137
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
99
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

विविध स्पर्धा परीक्षांत महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश; गुणवंतांचा सत्कार

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In