• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा घरकुल घोटाळा; चौकशीची भाजपची मागणी, प्रशासनावर गंभीर आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूर नगर पंचायतीत २ कोटींचा घरकुल घोटाळा; चौकशीची भाजपची मागणी, प्रशासनावर गंभीर आरोप
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

माहूर (प्रतिनिधी) : माहूर नगर पंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल २ कोटी रुपयांचा घरकुल निधी अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, दोषींवर फौजदारी कारवाईसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सन २०१७ ते २०२१ या कालावधीत १३२ लाभार्थ्यांसाठी मंजूर झालेला निधी नियमांना बगल देऊन एका खाजगी संस्थेकडे वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘मे. नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था, अकोला’ या संस्थेला काम देताना आवश्यक प्रशासकीय परवानग्या न घेता आणि संशयास्पद पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

भाजपच्या निवेदनानुसार, तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगर अभियंता यांच्या संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तसेच लाभार्थ्यांना मिळणारे घरकुल अनुदान थेट न देता इतर कारणांसाठी वळवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नगर परिषद प्रशासन संचालनालयाने २२ जुलै २०२५ रोजी या प्रकरणाची दखल घेत रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे केली आहे. दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून गोरगरीब लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष सागर महामुने, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

आजऱ्यात भीषण दुर्घटना; घराची भिंत कोसळून शिक्षिका व विद्यार्थिनीचा मृत्यू, निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

Next Post

नायगावमध्ये २० वर्षांपासून रखडलेल्या शेतरस्त्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
नायगावमध्ये २० वर्षांपासून रखडलेल्या शेतरस्त्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा

नायगावमध्ये २० वर्षांपासून रखडलेल्या शेतरस्त्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In