• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची संघटनेची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
परंडा तहसीलदारांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची संघटनेची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

धाराशिव (प्रतिनिधी) : परंडा येथील तहसीलदार निलेश काकडे यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, १५ एप्रिल रोजी तहसीलदार निलेश काकडे हे शासकीय कामकाज आटोपून बाहेर पडत असताना तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर योगेश मिटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) आणि अन्य एका व्यक्तीने त्यांचे वाहन अडवले. यावेळी संबंधितांनी शिवीगाळ करत वाहनावर हातोडा मारण्याचा प्रयत्न केला तसेच तहसीलदारांच्या दिशेने धाव घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

तसेच, चांदणी नदी परिसरातही वाहन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. “निवेदनावर कारवाई का झाली नाही?” असा जाब विचारत धमकी दिल्याचेही निवेदनात नमूद आहे.

संघटनेने या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप देत तालुका दंडाधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. राज्यात यापूर्वीही अशा घटना घडल्याने प्रत्येक तहसीलदार व नायब तहसीलदारांना कायमस्वरूपी सशस्त्र पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा अशा घटनांना आळा बसणार नाही, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

या निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी तसेच अनेक तहसीलदार व नायब तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

नायगावमध्ये २० वर्षांपासून रखडलेल्या शेतरस्त्याचा मार्ग मोकळा; शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

उदगीर पत्रकार अधिवेशनात नामांकित टीव्ही अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना प्रेरणा

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
1
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
140
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
104
Next Post
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनात नामांकित अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना नवी दिशा

उदगीर पत्रकार अधिवेशनात नामांकित टीव्ही अँकर्सचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना प्रेरणा

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In