• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

हदगाव (प्रतिनिधी) :
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हदगाव येथे १०० जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकारातून हा सोहळा दि. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पार पडणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यासाठी हदगाव येथील डोंगरगाव रोडवरील रामलीला मैदानावर भव्य मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल १०० गरजू वधू-वरांचा विवाह विनामूल्य लावून देण्यात येणार असून, विवाहासाठी आवश्यक सर्व सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

आर्थिक अडचणीमुळे विवाह लांबणीवर टाकणाऱ्या कुटुंबांसाठी हा सोहळा दिलासादायक ठरणार असून, समाजात एकोपा व समतेचा संदेश देणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, ऐनवेळी लग्न ठरलेल्या इच्छुक जोडप्यांनाही या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांनी सांगितले की, हा उपक्रम केवळ विवाह सोहळा नसून समाजातील गरजू घटकांना आधार देणारा एक सामाजिक प्रयत्न आहे. त्यामुळे पात्र जोडप्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकूणच, हदगाव येथे होणारा हा सामूहिक विवाह सोहळा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: Gajanan Narwade
Previous Post

सेलू तालुक्यात अस्वलाचा थरार; सालई (पेवठ) येथे शेतकरी गंभीर जखमी

Next Post

मुंडवाडी येथे बिबट्याचा हल्ला; गायीचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीती

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

मुंडवाडी येथे बिबट्याचा हल्ला; गायीचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीती

ताज्या बातम्या

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In